शिवसेनेच्या अभ्यासू नगरसेवकांची पत्नी तर, त्यांच्याही पुढे! - Harshatai Badgujar explain the CIVIc Issues... | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेच्या अभ्यासू नगरसेवकांची पत्नी तर, त्यांच्याही पुढे!

प्रमोद दंडगव्हाळ
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

"भाऊ तुम्ही थोडं थांबा, मला काही महत्वाचं बोलायचं आहे!" असे सांगत त्यांना थांबवल. नंतर त्यांनी शहराच्या व नागरिकांच्या समस्या एव्हढ्या अभ्यासपूर्ण मांडल्या, की सगळे कान देऊन एैकतच राहिले. गंमत म्हणजे या महिला नगरसेविका आहेत, श्री. बडगुजर यांच्या पत्नी नगरसेविका हर्षाताई बडगुजर.

सिडको : सुधाकर बडगुजर हे ज्येष्ठ वव अभ्यासु नगरसेवेक. ते बोलत असतील तर कोणी मध्ये बोलायचे धाडस करीत नाही. मात्र एका महिलेने, त्यांना थांबवत, "भाऊ तुम्ही थोडं थांबा, मला काही महत्वाचं बोलायचं आहे!" असे सांगत त्यांना थांबवल. नंतर त्यांनी शहराच्या व नागरिकांच्या समस्या एव्हढ्या अभ्यासपूर्ण मांडल्या, की सगळे कान देऊन एैकतच राहिले. गंमत म्हणजे या महिला नगरसेविका आहेत, श्री. बडगुजर यांच्या पत्नी नगरसेविका हर्षाताई बडगुजर.

आरक्षणामुळे महिलांना लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळाली. मात्र अभ्यास, जनसेवेची आवड असले तर या संधीचा सोने करणारी महिला देखील असतेच. सिडकोच्या प्रभाग समितीत शहराच्या समस्यांवर चर्चा सुरु असतांना असा अनुभव आला. नगरसेवक सुधाकर बडगुजर हे अभ्यासु नगरसेवक आहेत. मात्र त्यांच्या पत्नी देखील तेव्हढ्याच नागरिकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या आहेत, याचा प्रत्यय आला.  त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांवर सदैव जागरुक असलेले सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी तर त्यांच्याही एक पाऊल पुढे असे चित्र दिसले.

"भाऊ तुम्ही थोडं थांबा, मला काही महत्वाचं बोलायचं आहे ! असं सांगून हर्षाताईंनी  सिडकोच्या राजकारणात प्रभुत्व असलेल्या नगरसेवक बडगुजर यांना थांबवत आपले म्हणने मांडले. त्यांनी मांडले. आणि प्रभागातील समस्या उपस्थित केल्या ! 

त्याचे झाले असे की गेल्या अनेक महिन्यांपासून लॉक डाऊन  नंतर प्रथमच सिडको प्रभागाची सभा ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन घेण्यात आली. त्यामुळे प्रत्येक नगरसेवक आपल्या प्रभागातील समस्या मांडू लागले. अशातच नेहमीप्रमाणे सरत्याशेवटी जेव्हा शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर आपले म्हणणे मांडण्यासाठी सभागृहात उभे राहिले. नेमके त्याच वेळी त्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका हर्षा बडगुजर या आपले म्हणणे मांडण्यासाठी सभागृहात उभ्या राहिल्या आणि त्या म्हणाल्या  "भाऊ तुम्ही थोडं थांबा, मला काही महत्वाचं बोलायचं आहे " असं सांगत श्री. बडगुजर त्यांचे बोलणे सुरू होण्यापूर्वीच  थांबविले. आपले म्हणणे त्यांनी मांडले. त्यामुळे स्त्रीचा आदर व दबदबा केवळ घरातच नव्हे तर बाहेरही असतो, हे या प्रसंगावरून सभागृहातील उपस्थितांना दिसून आले. अर्थात यावेळी अनेकांने आपले हसु लवपता आले नाही.  यामुळे सभागृहातील तणावही निवळण्यास मदत झाली. 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख