हे भारतातच घडू शकते बर का!, कोरोनामुळे तो नोटासुद्धा इस्त्री करुन घेतो

ग्राहकांनी दिलेल्या नोटा तो स्विकारतो मात्र हाताचा स्पर्श न करता चिमट्याने. जवळच त्याने इस्त्री ठेवली आहे. या नोटांना इस्त्री करुन त्या कडक अर्थात कोरोनामुक्त झाल्यावर मगच तो त्या गल्ल्यात टाकतो. हा एक नवा प्रकार कोरोनाने लोकांना दाखवला आहे.
हे भारतातच घडू शकते बर का!, कोरोनामुळे तो नोटासुद्धा इस्त्री करुन घेतो

नाशिक : भारतीय नागरीकांनी जगाला "जुगाड' नावाचा अनोखा शब्द दिला आहे. हा जुगाड कुठे, केव्हा, कशासासाठी व कोण करेल याचा नेम नाही. त्यापुढे भले भले तज्ञ हात टाकतात. अशीच गंमत शहरातील एका हलवायाने केली आहे. कोरोनाच्या लॉकडाउन नंतर दुकान सुरु केल्यावर त्याने कोरोनाला दाराबाहेर ठेवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. ग्राहकांनी दिलेल्या नोटा तो स्विकारतो मात्र हाताचा स्पर्श न करता चिमट्याने. जवळच त्याने इस्त्री ठेवली आहे. या नोटांना इस्त्री करुन त्या कडक अर्थात कोरोनामुक्त झाल्यावर मगच तो त्या गल्ल्यात टाकतो. हा एक नवा प्रकार कोरोनाने लोकांना दाखवला आहे. 

या हलवायाने सरु केलेल्या या प्रयोगाला जुगाड यासाठी म्हणायचे, की कोणीही वैद्यकीय तज्ञ त्याला सहज दादा देईल. कारण एव्हढ्या उष्ण तापमानात नोटांवर कोरोनाचे विषाणू असले तरी तो शिल्लकच राहणार नाही. मात्र हा गडी मास्क व हातमौजे याविषयी फरासा जागरुक नाही. त्यामुळे उपाय शोधला मात्र दक्षता पुर्ण नाही, थोडीशी आणखी घेतली तर बरे, असे अनेकांना वाटतेय. 

कोरोनाचे पहिले लॉकडाऊन सुरु झाले अन्‌ नोटेच्या माध्यमातूनही कोरोनाचा संसर्ग होतो. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्या दिवसापासून नोटांना हात लावणे बंद झालं. पंचवटी पोलिस ठाण्यासमोरील ओम दुग्धालय अन्‌ स्वीटस्‌चे मालक महेश बनछोडे यांनी "करन्सी'ला थेट स्पर्श न करता व्यापार करण्याचा पर्याय शोधला आहे. ते ग्राहकांकडून लांब चिमट्याने नोटा घेतात. त्या नोटेला कडक इस्त्री करतात अन्‌ त्यानंतर गल्ल्यात नोटा ठेवल्या जातात. चिमट्याने नोटा घेऊन इस्त्री केली जाते म्हटल्यावर नाण्यांचं काय? असा स्वाभाविक प्रश्‍न तयार होतो. त्यावरही श्री. बनछोडे यांनी पर्याय केलायं. नाणी सॅनिटायझरमध्ये टाकून मग ती गल्ल्यात ठेवली जातात. ग्राहक त्यांना "अण्णा' या टोपण नावाने संबोधतात. 

दूध आणि स्वीटस्‌पासून दररोज सकाळी व सायंकाळचा आठ ते दहा हजार रुपायांचा अण्णांचा गल्ला आहे. ग्राहकांकडून नोटा लांबट चिमट्याने घेतल्यावर शेजारीच बाकावर कापड टाकून इस्त्रीची सोय केली आहे. नोटांवरुन इस्त्री फिरवल्यावर थोडासा धूर तयार होतो. मात्र नोटा कडक होतात. इस्त्रीने नोटांचे आयुष्य वाढते असे अण्णा ग्राहकांना आवर्जून हसतमुखाने सांगतात. त्यांच्या गल्ल्यातली प्रत्येक नोट एकदम कडक अन्‌ करकरीत. त्यामुळे माझ्याकडील निर्जंतुक नोटा अथवा नाणी घेणाऱ्याला आनंद होतो, असे अण्णा म्हणतात. 

दिंडोरी रोडवर पंचवीस वर्षापासूनचे अण्णांचे हे दुकान आहे. इथे सकाळी व सायंकाळी ग्राहकांची भली मोठी रांग लागते. त्यांचे सर्वच ग्राहक नियमित येणारे असल्याने प्रत्येकाशी त्यांची नावानिशी ओळख झाली आहे. कितीही गर्दी असली, तरी एकाही नोटेला हात न लावता ती चिमट्यानेच स्विकारतात. हे त्यांच्या ग्राहकांनाही माहिती झाले आहे. सुरुवातीला ग्राहकांना आश्‍चर्य वाटले, पण आता कोरोना परिस्थिती लक्षात आल्यावर महेशआण्णा करतात ते बरोबरच आहे, असे सर्वांना वाटते. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=EOlLoEsNi_cAX9jwHJm&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=c64de77152e8fd600eb6040b5eaedc10&oe=5EEDBE27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com