`स्वाभिमानी`चे माजी प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुलेंचा `राष्ट्रवादी`त प्रवेश 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी आज श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत विविध पदाधिका-यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रेवश केला. यावेळी श्री. भुजबळ यांनी त्यांचे स्वागत केले.
`स्वाभिमानी`चे माजी प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुलेंचा `राष्ट्रवादी`त प्रवेश 

नाशिक : सध्यातरी हिंदुस्थानात शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास आणि जान असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्यासारखा दुसरा नेता नाही. त्याच्या नेतृत्वाखाली काम करणे आपल्या सर्वांना लोकहिताचे ठरेल, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी आज श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत विविध पदाधिका-यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रेवश केला. यावेळी श्री. भुजबळ यांनी त्यांचे स्वागत केले. ते म्हणाले, श्री. वडघुले यांच्या ज्ञानाचा, अभ्यासाचा वापर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी करेल. त्यांच्यासारख्या शेतकरी, नागरिकांच्या हिताचे प्रश्न सोडवितांना प्रसंगी लाठ्या काठ्या खाण्याची वेळ आली तरी बाजूला न हटणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे.  

श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत श्री. वडघुले यांच्यासह पदाधिकारी चंद्रकांत बच्छाव, राम निकम, शरद लभडे, रतन मटाले, मनोज भारती, निलेश बिरारे, शरद घुगे आदींनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केला. 

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, हंसराज वडघुले हे अभियंता असून शासकीय सेवेत १४ वर्ष काम देखील केलं. त्यानंतर शेतकरी चळवळीत योगदानासाठी आपल्या पदाचा  राजीनामा देत स्व. शरद जोशी व राजू शेट्टी यांच्यासोबत काम सुरु केलं. माध्यम क्षेत्रात देखील साप्ताहिकाच्या संपादक पदी, नाशिक बाजार समितीचे संचालक, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत व्याख्याता म्हणून त्यांनी काम केलं. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने करत शेतकरी कर्जमाफी मिळावी यासाठी यशस्वी लढा दिला. राज्याच्या सुकाणू समितीत राज्यनियंत्रक पदावरून जबाबदारी पार पाडली. शेतकरी चळवळीत काम करत असतांना त्यांनी सातत्याने मोर्चे, आंदोलन, निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून दिला. त्यांनी आज राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या या ज्ञानाचा, अभ्यासाचा जनतेच्या हितासाठी वापर करून पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असे आश्वस्त केले.

यावेळी हंसराज वडघुले म्हणाले की, देशभरात राजकीय सामाजिक पार्श्वभूमीवर मंत्री भुजबळ यांनी केलेलं काम आमच्यासाठी मार्गदर्शक ठरले आहे. सामाजिक हिताच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करतांना तसेच संकटामध्ये त्यांनी आम्हाला मदत केली. स्व. शरद जोशी तसेच राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी आजवर काम केलं आहे. यापुढील काळात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी हितासाठी व नागरिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करू. 

माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, चिन्मय गाढे, समाधान जेजुरकर, योगेश निसाळ यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
...
 

https://scontent.fpnq1-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=FRmeOaUL9k8AX_H0YzY&_nc_ht=scontent.fpnq1-1.fna&oh=5186906ab3e959bc5a7696c159f7befb&oe=5FAF8AA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com