रक्षा खडसेंच्या बैठकीला निम्मे नगरसेवक फिरकलेच नाही!

खासदार रक्षा खडसे यांनी निवडणुकांच्या पार्श्वभारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीचा आढावा घेतला. मात्र त्यांच्या बैठकीला अनेक कार्यकर्ते फिरकलेच नाहीत. विशेष म्हणजे निम्म्या नगरसेवकांनी दांडी मारल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
Raksha Khadse
Raksha Khadse

तळोदा : खासदार रक्षा खडसे (M.P. Raksha Khadse) यांनी निवडणुकांच्या पार्श्वभारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक (BJP Office bearers Review meeting) घेऊन निवडणुकीचा आढावा घेतला. मात्र त्यांच्या बैठकीला अनेक कार्यकर्ते फिरकलेच नाहीत. विशेष म्हणजे निम्म्या नगरसेवकांनी (50% corporators not attend the meeting) दांडी मारल्याने तो चर्चेचा विषय ठरला. 

श्रीमती खडसे यांच्या उपस्थितीत भाजपच्या जिल्हा कार्य समितीची बैठक बुधवारी आदिवासी भवनात झाली.  या वेळी जवळपास निम्म्या नगरसेवकांनी त्यांच्या बैठकीस दांडी मारली.  वास्तविक भाजपची शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख आहे. याअगोदरही अनेक कार्यक्रमांना विद्यमान नगरसेवक दांडी मारत आले आहेत. मात्र आजच्या कार्यक्रमाला नगरसेवकांच्या अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

यावेळी खडसे यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर जोर दिला. त्या म्हणाल्या, राज्य शासनाने लक्ष न दिल्याने ओबीसींचे आरक्षण गेले असून, आज त्याच शासनाचे मंत्री त्यासाठी आंदोलन करीत आहेत, ते मंत्री नागरिकांची दिशाभूल करीत ढोंग करीत आहेत. मराठा आरक्षणाबाबतही शासनाने तेच केले असून, सरकार ओबीसी, मराठा, आदिवासी समाजावर अन्याय करीत आहे. भाजप आरक्षणासंदर्भात कोर्टात जाणार आहे, तसेच याबाबत कोर्टाचा निकाल लागेपर्यंत जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुका स्थगित व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहोत.

राज्य शासनाचा खेळखंडोबा
यावेळी संघटनमंत्री रवी अनासपुरे म्हणाले, की महाराष्ट्र शासनावर युवक मोठ्या प्रमाणावर नाराज असून, शासनाने नोकरीचा खेळखंडोबा केला आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना केल्या. मात्र राज्य शासनाने या काळात नागरिकांसाठी काहीही केले नाही. चौधरी यांनी सांगितले, की ‘भाजप आपला उमेदवार, कमळ आपलं चिन्ह व प्रत्येक व्यक्ती हा जिल्हाध्यक्ष’ यानुसार भाजपाची वाटचाल सुरू आहे. 

या वेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, संघटनमंत्री रवी अनासपुरे, खासदार डॉ. हीना गावित, आमदार राजेश पाडवी, सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावित, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, तालुकाध्यक्ष भरत गावित, सरचिटणीस राजेंद्र गावित, तालुकाध्यक्ष बळिराम पाडवी, अनिमिका चौधरी, नीलेश माळी, यशवंत ठाकरे, नगरसेवक हेमलाल मगरे, अमोनोद्दीन शेख, रामानंद ठाकरे, नगरसेविका अंबिका शेंडे, स्वप्नील बैसाणे, एजाज शेख, प्रदीप शेंडे, कैलास चौधरी, जगदीश चौधरी आदी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com