घरात बसणाऱ्यांना कोरोना रुग्णांची अडचण काय समजणार? : गुलाबरावांचा चिमणराव पाटलांना टोला

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिवसेना पक्षांतर्गत असलेले वादही आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत.
Gulabrao Patil's criticism Chimanrao Patil on Corona
Gulabrao Patil's criticism Chimanrao Patil on Corona

एरंडोल (जि. जळगाव) : "आपली पत्नी आणि मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असतानाही आपण जिल्हाभर फिरून कोरोनाच्या रुग्णालयात जाऊन रुग्णांना आधार देत आहोत. परंतु काही लोकप्रतिनिधी आपल्या घरातच थांबून आहेत. ते बाहेर येण्यास तयार नाहीत,' असा टोला जळगावचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात एरंडोल येथील पक्षाचे आमदार चिमणराव पाटील यांना अप्रत्यक्ष लगावला. 

दरम्यान, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शिवसेना पक्षांतर्गत असलेले वादही आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. 

धरणगाव रस्त्यावर कमल लॉन्स येथे सुरु करण्यात आलेल्या अष्टविनायक कोविड सेंटरचे उदघाटन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमेश परदेशी हे होते. 

शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले की, कोरोना विषाणू साथीच्या काळात सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी स्वत:चा जीव धोक्‍यात घालून रुग्णांची मदत करीत आहेत. मात्र, काही लोकप्रतिनिधी कोरोना विषाणूच्या भितीपोटी घरातच थांबून आहेत. मला स्वत:ला रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार आहेत. माझ्या परिवारातील सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तरीही आपण संपूर्ण जिल्ह्यात फिरून कोरोना रुग्णांच्या कायम संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडवित आहे. 

"जे घरात बसून आहेत. त्यांना रुग्णांची अडचण समजू शकत नाही,' असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी मतदार संघाच्या लोकप्रतिनिधींना नाव न घेता लगावला. एरंडोल मतदार संघातील शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील हे कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यापासून घरातच आहेत. ते मतदार संघात फिरले नसल्याची नागरिकांची तक्रार आहे, त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांनाच हा टोला लगावल्याची चर्चा कार्यक्रम स्थळी सुरू होती. त्यानंतर तालुक्‍यातही चर्चा रंगली होती. 

हेही वाचा : नेत्यांची वेळ चुकली...कॉंग्रेसच्या माजी खासदाराकडून घरचा आहेर 

जळगाव : "गांधी घराण्याशिवाय अध्यक्षपदासाठी दुसरा कोणताही विचार होऊच शकत नाही. सोनिया गांधी अध्यक्ष होत नसतील तर त्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्ष करावे. आजच्या स्थितीत त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपला टक्कर देता येईल," असे मत प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले आहे. याबाबत थेट सोनिया गांधीना मेलही पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले. 

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत पक्षात जोरदार वाद सुरू झाले आहेत. त्याबाबत कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याशिवाय कोणाचाच विचार होऊ शकत नाही.' 

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जे विचार व्यक्त केले आहे. त्यांना प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पाठींबा आहे. सोनिया गांधी अध्यक्ष होवू शकत नसतील तर राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्विकारावे. आजच्या स्थितीत भारतीय जनता पक्षाला तेच खऱ्या अर्थाने टक्कर देवू शकतील. याबाबत आम्ही सोनिया गांधीना यांना मेलही केला असल्याचे त्यानी सांगितले. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com