गुलाबराव पाटलांनी माझ्या कामांचे कैातुक करुन प्रोत्साहन द्यावे : खडसे

गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यावर टीका केली होती.
Sarkarnaa Banner (58).jpg
Sarkarnaa Banner (58).jpg

जळगाव : ''केळी पीक योजनेच्या नुकसान भरपाईचे निकष बदल करण्याचे श्रेय मी घेत नाही, मात्र मंत्री  गुलाबराव पाटील हे मला वडीलांसारखे आहेत, त्यांनी माझ्यावर टीका न करता मुलीने चांगले काम केले म्हणून प्रोत्साहन देण्याची गरज होती,'' असे भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे.Gulabrao Patil should encourage my work Raksha Khadse

केळी पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यावरून केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी शिवसेना यांच्यात  श्रेयाची स्पर्धा घेण्यावरून वाद सुरू आहे. याच वादातून राज्याचे पाणी पुरवठा योजना मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यावर टीका केली होती.

ते म्हणाले, ''हवामानावर आधारित फळपीक विम्याचे निकष राज्य शासनाने बदलले परंतु  भाजप खासदार रक्षा खडसे या केंद्राने निकष बदलल्याचा खोटा दावा करीत आहेत, कुठे लग्न दिसले की आपला वाजा घेवून त्या ठिकाणी वाजविण्यास त्या हजर होतात,'' असा टोलाही त्यांनी लगावला होता.

खासदार रक्षा खडसे यांनी ही शेलक्या शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांना उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, ''मी गेल्या अनेक दिवसांपासून मुलांसोबत बाहेरगावी होते, या बाबत मी कोणतेही श्रेय घेतले नाही. माझे कुठेही वक्तव्य नाही, या मध्ये कोणाचेही श्रेय नाही, शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही मांडला, त्यामुळे राज्य सरकारला निकष बदलावे लागेल. मात्र, यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर टीका करावी याचे मला आश्चर्य वाटत आहे, ते मला वडीलांसारखे आहेत मुलगी म्हणून त्यांनी या मुद्द्यावर चांगले काम केल्याचे माझे कौतुक करून प्रोत्साहन देण्याची गरज होती.

ओबीसी आरक्षणावरुन खडसेंच्या कुटुंबातच वाद
 जळगाव : भाजपने (BJP) ओबीसी (OBC) समाजाचा विचार केला नसता तर विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांना संधी मिळाली नसती, असा टोला भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसे यांना लगावला आहे. ओबीसी आरक्षणावरून माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची मुलगी आणि सून यांच्यात राजकीय सामना सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अॅड. रोहिणी खडसे या कन्या आहेत. त्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या सदस्या आहेत. रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. त्यामुळे दोघींचे नणंद भावजयीचे नाते आहे. ओबीसी आरक्षणावरून रोहिणी खडसे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला  होता. यावर खासदार रक्षा खडसे यांनी ही तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले आहे. यामुळे ओबीसी आरक्षणावरुन खडसे कुटुंबातच वाद निर्माण झाल्याचे दिसत आहेत.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com