गुलाबराव पाटील म्हणाले, `लेकीने ही बापाच्या हद्दीत रहावे` - Gulabrao patil, said, Daughter also should stay limit. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

गुलाबराव पाटील म्हणाले, `लेकीने ही बापाच्या हद्दीत रहावे`

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 जून 2021

लेक आहे, तर लेकीनेही बापाच्या हद्दीत रहावे, असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजप खासदार रक्षा खडसे यांना लगावला आहे.

जळगाव : लेक आहे, तर लेकीनेही बापाच्या हद्दीत रहावे, (Daughter should not cross the limit of Father) असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री, शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse)  यांना लगावला आहे.

केळी पीक विमा योजनेचे निकष सरकारने बदलले. याचे श्रेय घेण्यावरून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे यांच्यात शाब्दीक शरसंधान झाले होते. त्यात दोघांकडूनही राजकीय आरोप-प्रत्यारोप झाल्याने वाद निर्माण झाला होता. खासदार खडसे यांनी हे निकष केंद्रातील भाजप सरकारने बदलले असा दावा केला होता.  मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र हे निकष राज्य सरकारमुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने बदलण्यात आले, असा दावा केला होता. 

यासंदर्भात श्री. पाटील यांनी, `जिथे लग्न दिसले, तिथे बाजा वाजविण्यास रक्षा खडसे हजर होतात` असा टोला लगावला होता. यावर खासदार खडसे यांनी गुलाबराव पाटील मला वडीलांसरखे आहेत. त्यांनी लेकीवर टीका न करता तीच्या कामाचे कौतुक करावे, असे शैलीदार उत्तर दिले होते. 

यासंदर्भात श्री. पाटील यांच्याशी संपर्क केल्यावर, त्याला उत्तर देताना आज ते म्हणाले, `लेक आहे, तर लेक आहेच. तीने बापाच्या कामाचा विचार करावा. लेकीने बापाच्या हद्दीत रहावे` असे म्हटले.
...

हेही वाचा...

इगतपुरीतील हुक्का पार्टीवरील छाप्यात बिग बाॅसची अभिनेत्री ताब्यात!
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख