महाराष्ट्र कोरोनाने त्रस्त; गिरीष महाजन बंगालमध्ये व्यस्त! - Gulabrao patil criticised BJP Girish Mahajan, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

महाराष्ट्र कोरोनाने त्रस्त; गिरीष महाजन बंगालमध्ये व्यस्त!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

महाराष्ट्रातील जनता कोरोनाच्या संसर्गाने त्रस्त झाली आहे. त्यांना मदत करायचे सोडून भारतीय जनता पक्षाचे आमदार पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत, असा टोला शिवसेना नेते व राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना लगावला आहे.

जळगाव : महाराष्ट्रातील जनता कोरोनाच्या संसर्गाने त्रस्त झाली आहे. त्यांना मदत करायचे सोडून भारतीय जनता पक्षाचे आमदार पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत, असा टोला शिवसेना नेते व राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना लगावला आहे.

भाजपचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन पक्षाच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये ठान मांडून बसले आहेत. त्याबाबत टीका करताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजप खासदार उदनराजे यांनी भिक मांगो आंदोलन केले. प्रश्न आंदोलनाचा नाही. ते राजे आहेत, त्यांच्यावर टीका करण्याइतका मी मोठा नाही. त्यांचा मी आदर करतो. मात्र आज लोक पैसे देऊन उपचार केंद्र सुरू करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा  संसर्ग  सातत्याने वाढत आहे. जनता कोरोनाशी संघर्ष करीत आहे. आम्ही रस्त्यावर उतरून त्यांना मदत करीत आहोत. भाजपचे आमदार मात्र पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी धाव घेत आहे.  त्यामुळे याना जनतेची किती काळजी आहे हे दिसून येत आहे. राज्यातील जनता हे विसरणार नाही. 

गेल्या आठवड्यात श्री. महाजन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तसेच गुलाबराव पाटील यांच्यावर टिका केली होती. यानिमित्ताने श्री. पाटील यांनी त्याची परतफेड केली आहे. 
...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख