ग्रामपंचायतींच्या कारभाऱ्यांची धडधड...कार्यकर्त्यांत हूरहूर 

जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५ ग्रामपंचायतींसाठी जिल्हाभरात ११ हजार ५६ उमेदवार नशीब अजमावीत आहेत. शुक्रवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. त्यात अनेक प्रस्थापित व आमदार, खासदारांचे अनुयायांचे भवितव्य ठरणार आहे.
Grampanchayat
Grampanchayat

नाशिक  : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५ ग्रामपंचायतींसाठी जिल्हाभरात ११ हजार ५६ उमेदवार नशीब अजमावीत आहेत. शुक्रवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. त्यात अनेक प्रस्थापित व आमदार, खासदारांचे अनुयायांचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे या नेत्यांत निकालाच्या उत्सुकतेमुळे मनात धडधड तर त्यांच्या कार्यकर्त्यांत हूरहूर आहे. प्रशासनाने त्याची दखल घेऊन मिरवणुकांना बंदी केली आहे. 

जिल्ह्यात दहा लाख ९५ हजार १३४ मतदारांपैकी आठ लाख ८० हजार ६२ (८०.३६ टक्के) मतदारांनी त्यांच्या गावाचे कारभाऱ्यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात निश्चित केले. आज मतपेटीतून कुणाचा भाग्योदय होतो, हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. शुक्रवारी ५६५ ग्रामपंचायतींत चार लाख तीन हजार ४१२ महिला, चार लाख ७० हजार ६४९ पुरुष या प्रमाणे आठ लाख ८० हजार ६२ उमेदवारांनी त्यांच्या गावाच्या कारभाऱ्यांचे भवितव्य मतदान यंत्रात निश्चित केले. त्यामुळे रविवारी दिवसभर जिल्हाभरातील १३ केंद्रांवरील १४२ टेबलांवर ७४० मतमोजणी कर्मचाऱ्यांचे नियोजन सुरू होते. पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मतमोजणी आणि त्यानंतरचे काही तास महत्त्वाचे असतात. जय-पराजय हा मुद्दा महत्त्वाचा असतो. त्यामुळे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

८० टक्के मतदान
कोरोनाच्या लॉकडाउनच्या थंडाव्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांनिमित्ताने जिल्हाभर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या मोर्चेबांधणीच्या अंगाने निवडणुका लढल्या गेल्या. अपवादाच्या ग्रामपंचायती वगळता सगळीकडे मोठ्या उत्साहात मतदान झाले. सरासरी ८० टक्क्यांहून अधिक मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत वादावादीचे प्रसंग उद्‌भवले. प्रस्थापित विरुद्ध तरुणाई, अशा स्वरूपाच्या या लढतीत राजकीय चित्र स्पष्ट होईल.

तुरळक अपवाद वगळता जिल्हाभर शांततेत निवडणुका पार पडल्या. सोमवारी (ता. १८) मतमोजणीसाठी पुरेसा बंदोबस्त लावण्यात आला आहे. अतिसंवेदनशील आणि संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त कुमक तैनात करण्यात येणार आहे.
- सचिन पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com