महाआघाडीसाठी ग्रामपंचायत प्रशासक नियुक्तीचा पेपर कठिण !

कोरोनोमुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबल्या. आता तेथे प्रशासक नियुक्त केले जाणार आहे. मात्र एकाच ग्रामपंचायतीत अनेक गट, त्यात तालुक्‍याचे आमदार व त्यांचे विरोधी गट अशी राजकीय विभागणी असते. त्यांनाग्रामपंचायतीवर सत्ता महत्वाची असते.
महाआघाडीसाठी ग्रामपंचायत प्रशासक नियुक्तीचा पेपर कठिण !

नाशिक : कोरोनाने राज्य सरकारपासून तर अगदी गावातल्या ग्रामपंचायतींची परिक्षा घेतली आहे. मात्र ही परिक्षा अद्याप संपलेली नाही. एकाच ग्रामपंचायतीत अनेक गट, त्यात तालुक्‍याचे आमदार व त्यांचे विरोधी गट अशी राजकीय विभागणी यात एक- एक मतासाठी ग्रामपंचायतीवर सत्ता महत्वाची असते. त्यामुळे प्रशासक नियुक्ती ही प्रत्येक पालकमंत्र्यासाठी कठीण परिक्षा ठरु शकते. 

कोरोनोमुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबल्या. आता तेथे प्रशासक नियुक्त केले जाणार आहे. मात्र त्यामुळे महाआघाडीच्या शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांचील कोणाचा प्रशासक नियुक्त करायचा यावरुन पालकमंत्री व आमदारांची चांगलीच परिक्षा होणार आहे. हा कठीण पेपर महाविकास आघाडी कास सोडवणार? याचीच उत्सुकता आहे. नाशिक जिल्ह्यात 519 ग्रामपंचायतींत प्रशासक नियुक्त करायचे आहेत. यामध्ये बागलाण 40, चांदवड 53, देवळा 11, येवला 44, नाशिक 25, नांदगाव 59, मालेगाव 99, इगतपुरी 4, दिंडोरी 16, त्रंबक 3, सिन्नर 100, निफाड 65 अशी संख्या आहे.

राज्यातील एप्रिल ते जून मध्ये मुदत संपलेल्या 1 हजार 566 तर जिल्ह्यातील 102 ग्रामपंचायतींवर कलम 35 नुसार विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली आहे. जुलै ते डिसेंबर मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील 12 हजार 668 व जिल्ह्यातील 519 ग्रामपंचायतीवर आता प्रशासक नेमला जाणार आहे. कलम 35 मध्ये अनेक तांत्रिक अडथळे असल्याने शासनाने यात दुरुस्ती केली आहे. मात्र नव्या अध्यादेशात शासनाने योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करावी, असे म्हटल्याने प्रशासनासह सरपंच, जनतेमध्ये गोंधळ आहे. योग्य व्यक्ती म्हणजे कोण याचे उत्तर सापडत नसल्याने आता पुन्हा जिल्हा परिषदांनी शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. 

अधिकार पालकमंत्र्यांना... 
वेगवेगळे आदेश निघत असताना राज्यातील विद्यमान सरपंच मात्र आम्ही कोरोना काळात चांगले काम केल्याने आम्हालाच प्रशासन म्हणून नियुक्त करा, अशी मागणी करत आहे. त्यातच आता पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार प्रशासक नियुक्त होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रक्रियेला देखील सरपंचाचा विरोध होत आहे. असे झाल्यास या नियुक्तीला राजकीय व गटबाजीचे स्वरूप येऊन गावोगावी गटबाजी वाढेल. नियुक्तीसाठी राजकारण सुरू होईल, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. प्रशासन मात्र शासनाकडून नव्याने सूचनांच्या प्रतीक्षेत आहे. 

...

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=zOkpGagCTKIAX87QsWa&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=0ebe751f396f712fc9a8a97964a8574d&oe=5F30FAA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com