राज्य शासन श्रद्धेच्या आड येणार नाही; पण निर्बंध पाळा

गणेशोत्सव नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. शासन कुणाच्याही श्रद्धेच्या आड येणार नाही; पण कोरोनाचे संकट घोंगावत असताना गणेशोत्सवानिमित्त गर्दी होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : गणेशोत्सव नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. (Ganesh Festival is a subject of belief) शासन कुणाच्याही श्रद्धेच्या आड येणार नाही; (Government will not come in beetween anybodies belief) पण कोरोनाचे संकट घोंगावत असताना गणेशोत्सवानिमित्त गर्दी होणार नाही, (But in Ganesh festival everybody should take care of covid19) याची काळजी नागरिकांनी घ्यावी. प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी अडवणूक होणार नाही. तसेच, सणासुदीच्या काळात वाढीव निर्बंध लादण्याचाही सरकारचा विचार नाही, असे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी येथे स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शनिवारी (ता. ४) कोरोना आढावा बैठक झाली. त्यानंतर श्री. भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदींसह आरोग्याधिकारी बैठकीला उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, की महिनाभरात कोरोनाची रुग्णसंख्या शंभरने घटली आहे. कोरोनाचा संसर्गदर २.८ टक्के, तर मृत्युदर २.११ टक्के आहे. म्युकरमायकोसिसचे जेमतेम २७ रुग्ण आहेत. याशिवाय लसीकरणही ३२ टक्क्यांहून ३६ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. कोरोनाचा प्रभाव घटत असल्याची ही लक्षणं आहेत. अशा स्थितीत गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय असल्याने, शासनाचा कोरोनाचे निर्बंध वाढविण्याचा विचार नाही. त्यामुळे गणेशोत्सवात पोलिसांकडून नियमानुसार परवानग्यांसाठी अडवणूक होणार नाही. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात गर्दी वाढून कोरोनाचा शिरकाव वाढणार नाही, याची नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे.

ऑक्सिजनचे नियोजन
तिसऱ्या लाटेच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात ४०० टन ऑक्सिजनची गरज भासणार आहे. त्यासाठी आतापर्यंत ३५० टनची सोय झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत आणखी १०० टन ऑक्सिजनचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे महिनाअखेर जिल्ह्यात ४५० टन ऑक्सिजन असेल.
---
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com