राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून आरोग्य विद्यापीठाच्या इमारतीचे उदघाटन - Governer onaugrate the Building at MHUS | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून आरोग्य विद्यापीठाच्या इमारतीचे उदघाटन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचे आणि सौरऊर्जा प्रकल्पाचे विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज उदघाटन झाले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ आणि विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर उपस्थित होते.

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचे आणि सौरऊर्जा प्रकल्पाचे विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज उदघाटन झाले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ आणि विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर उपस्थित होते. 

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या नुतनीकरणाची कामे करण्यात आली आहेत.  विद्यापीठ परिसरात २५० किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ॲपेक्स तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे विद्यापीठाला विनाशुल्क वीज उपलब्ध होणार आहे. विद्यापीठ आवारातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीच्या धन्वंतरी सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमावेळी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे.  राज्यपालांच्या हस्ते त्याचे अनावरन झाले. अद्याप हे कार्यक्रम सुरु आहेत. दिवसभर त्यांचे विविध कार्यक्रम होणार आहेत. 

ईपीएस पेन्शनर्स घेणार राज्यपालांची भेट 
दरम्यान राज्यपाल कोश्यारी राज्यसभेचे सदस्य असताना कामगारांना मिळणारी इपीएस ९५ पेन्शन औद्योगिक कामगार, सहकारी संस्था कर्मचारी, विविध महामंडळ कर्मचारी, सहकारी संस्था व संस्था कर्मचारी आदी १६२ क्षेत्रातील कामगारांना निवृत्तिवेतन योजना १९९५ ला लागू झाली होती. नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक कामगार, साखर, एसटी महामंडळ, एचएएल, विडी कामगार, पत्रकार आहेत. पेन्शनर्स मागण्यांसंदर्भात राज्यसभेने २०११ मध्ये भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्याबाबत २०१३ मध्ये अहवाल सादर केला. या पार्श्वभूमीवर जिल्हा पेन्शनर्स फेडरेशनचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट गेणार आहे. 
...
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख