राज्यपाल भगतसिह कोशियारी म्हणतात, `मी तर शेतकऱ्यांचाच मुलगा`

कांदा निर्यातबंदी आणि त्याविषयी शेतकऱी वर्गात व्यक्त झालेल्या तीव्र प्रतिक्रीया, आंदोलन या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी नाशिकच्या शेतकरी आंदोलकांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली.
राज्यपाल भगतसिह कोशियारी म्हणतात, `मी तर शेतकऱ्यांचाच मुलगा`

नाशिक : कांदा निर्यातबंदी आणि त्याविषयी शेतकऱी वर्गात व्यक्त झालेल्या तीव्र प्रतिक्रीया, आंदोलन या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी नाशिकच्या शेतकरी आंदोलकांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना केंद्र सरकारला कळवतो, असे आश्वासन देऊन शिष्टमंडळाला आश्वस्त केले.

या शिष्टमंडळाशी जवळपास पाऊन तास राज्यपालांनी चर्चा केली. यावेळी राज्यपाल म्हणाले, `मी देखील शेतकऱ्यांचाच मुलगा आहे. कांदा निर्यातबंदी संदर्भातील शेतकरी व त्यांच्या अडचणी, भावना मी केंद्र आणि राज्य शासनाकडे  भावना पोचवणार. शेतकरी वर्गाच्या अडचणी निश्चित मांडल्या जातील. राज्यपालांच्या सकारात्मक प्रतिसाद व राजभवन येथे झालेल्या चर्चेने शेतकरी संघर्ष संघटनेचे पदाधिकारी समाधानी झाले, असे संघटनेचे अध्यक्ष हंसराज वडघुले- पाटील यांनी सांगितले. 

यावेळी शेतकरी म्हणाले, प्रत्येक वेळी शासन सोईनुसार धोरण राबविते. केंद्र सरकार एकीकडे जिवनाश्यक वस्तूंबाबत कायदा करते. दुसरीकडे कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेते, हा विरोधाभास का?. असा सवाल करुन करोनाच्या लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कांदाप्रश्नी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्यात बंदी निर्णय मागे घेणे आवश्यक आहे. 

श्री वडघुले म्हणाले, म्हणाले, गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान सरकारने भरून द्यावे. कारण सध्या उत्पादनाचा खर्च देखील मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकरी विधेयकात शिवार खरेदी करताना शेतकऱ्याला आर्थिक संरक्षणाची, किमान आधारभूत किमतीची हमी असावी. त्याचा कायद्यांत अंतर्भाव व्हावा. निर्यातबंदी रद्द झाली पाहिजे. शेतकरी विधेयकात शेतकऱ्याला संरक्षण न मिळाल्यास राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु केले येईल. 

राज्यपालांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष हंसराज वडघुले, नानासाहेब बच्छाव, योगेश रायते, राम निकम, मनोज भारती, दीपक भदाणे, विनायक पवार, विद्या वेखंडे यांचा समावेष होता. 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=IJjfSVQdRK0AX_fZUfx&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=d06ce35e05e78c7dde20a0eb253fd63e&oe=5F93DB27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com