गुड न्यूज....नाशिक शहरात 58,497 रुग्ण कोरोनामुक्त झाले ! - Good News...Covid-19 Patients decreasing in nashik City | Politics Marathi News - Sarkarnama

गुड न्यूज....नाशिक शहरात 58,497 रुग्ण कोरोनामुक्त झाले !

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

नाशिक शहरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात येऊ लागल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. कालपर्यंत शहरात अठ्ठावन्न हजार 497 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तीन महिन्यांचा आढावा घेता गेल्या सर्वाधीक रुग्ण बरे झाले आहेत. नव्याने दाखल होणारे रुग्ण कमी होत असल्याचे चित्र आहे. 

नाशिक : नाशिक शहरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात येऊ लागल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. कालपर्यंत शहरात अठ्ठावन्न हजार 497 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तीन महिन्यांचा आढावा घेता गेल्या सर्वाधीक रुग्ण बरे झाले आहेत. नव्याने दाखल होणारे रुग्ण कमी होत असल्याचे चित्र आहे. 

कोरोनाचा जिल्ह्यात फैलाव होत असतांना गेल्या तीन महिन्यात चिंतेचा विषय ठरलेल्या नाशिक शहरात कोरोनाग्रस्त व बेर होणारे रुग्ण दोन्हींच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. महिनाभरात पासष्ट हजार 650 नागरिकांची चाचणी करण्यात आली. यामध्ये सतरा हजार 795 नागरिक पॅाझिटिव्ह आढळले. त्यामुळे नाशिक महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरवरील ताण कमी झाला आहे. प्रशासनाने यातील काही सेंटर्स बंद करण्याचा विचार व्यक्त केला होता. मात्र हिवाळ्यात या स्थितीत बदल होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने प्रशासनाने सध्या कोरोनाविषयी वेट अॅंड वॅाच भूमिका घेतली आहे.  

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील अठ्ठ्यांएैंशी हजार ६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत तीन हजार ९९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या रुग्णसंख्येत शनिवारी १३७ ने घट झाली.   आत्तापर्यंत एक हजार ६७०  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.  

जिल्ह्यात तालुकानिहाय रुग्णसंख्या अशी, नाशिक १४३, चांदवड २८, सिन्नर २९४, दिंडोरी १२६, निफाड ३००, देवळा २५, नांदगांव ९२, येवला ३६, त्र्यंबकेश्वर २२, सुरगाणा ०४, कळवण २३,  बागलाण ४३, इगतपुरी ४३, मालेगांव ग्रामीण ६६ असे एक हजार २४५  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहेत. 

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार ६१२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १२२  तर जिल्ह्याबाहेरील १६ असे तीन हजार ९९५  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  आजपर्यंत जिल्ह्यात त्र्यंन्नव  हजार ६७१ पॅाझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी अशी,  नाशिक जिल्हा ९३.१३  टक्के, नाशिक शहरात ९४.३९ टक्के, मालेगावमध्ये ९३.०६  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.४६ टक्के आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.९५ इतके आहे. नाशिक जिल्ह्यात ५९९, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात  ८६७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १६६  व जिल्हा बाहेरील ३८  अशा एक हजार ६७०  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 
...
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख