प्रेरणादायी...आयुक्त कैलास जाधव म्हणाले, भेटवस्तू नको, मास्क द्या! - Good Initiative..Comm Jadhav says Gi Mask not Gifts | Politics Marathi News - Sarkarnama

प्रेरणादायी...आयुक्त कैलास जाधव म्हणाले, भेटवस्तू नको, मास्क द्या!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनीही आपल्या कृतीतून असाच एक संदेश दिला. त्यांनी भेटवस्तू, मिठाई नको. मास्क आणि सॅनीटायझर द्या, असा फलकच लावला आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला.

नाशिक : सामान्यतः मोठ्या पदावरील व्यक्तींचे अनुकरण त्याचे सहकारी करीत असतात. त्यामुळे मोठ्यांनी आदर्श पायंडे पाडले, तर त्याची चर्चा होणारच. महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनीही आपल्या कृतीतून असाच एक संदेश दिला. त्यांनी भेटवस्तू, मिठाई नको. मास्क आणि सॅनीटायझर द्या, असा फलकच लावला आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला.

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांना मोठ्या प्रमाणात भेट वस्तु दिल्या जातात परंतू विद्यमान आयुक्त कैलास जाधव यांनी भेट वस्तु घेण्यास स्पष्टपणे नकार देताना गरजुंना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्याच्या सुचना अभ्यांगताना देताना आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरचं सुचना लावून नवा पायंडा पाडल्याने दिवाळी निमित्त आयुक्त कार्यालयात होणारी गर्दी आता कमी होणार आहे. त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी विशेषतः त्यांच्या सहकारी व कर्मचारी वर्गाने स्वागत केले आहे. आता कोण कोण त्यांचे अनुकरण करते याची उत्सुकता आहे. 

कोरोना संसर्गाने शहरात तोंड काढल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून आयुक्त कार्यालयातून नागरिकांना विविध प्रकारच्या सुचना दिल्या जात आहे. त्यात सॅनिटायझर वापरणे, मास्क घालणे, अनावश्‍यक गर्दीत जाणे टाळावे आदी प्रकारच्या सुचना दिल्या जात आहे. बाजारपेठे मध्ये मास्क घालूनचं प्रवेश करावा तसेच दुकानदारांना देखील मास्क परिधान केलेल्या ग्राहकानांच प्रवेश द्यावा अशा सुचना देण्यात आल्या असून त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकांना सुचना देताना आयुक्त कार्यालयात देखील नियम तंतोतंत पाळले जावे यासाठी आयुक्त जाधव यांनी त्यांच्या दालना बाहेरचं फलक लावला असून दिवाळी निमित्त कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तु, मिठाई, ड्रायफुट स्वीकारले जाणार नसल्याचे सुचना देण्यात आल्या आहेत. भेटवस्तु देण्याएवजी शहरातील झोपडपट्टी, वृद्धाश्रम, दिव्यांगांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले आहे.
...
 

https://scontent.fpnq1-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख