दिल्लीकरांनी केले खासदार हेमंत गोडसेंचे कौतुक - Godse`s Delhi Fans congratulate MP Hemant Godse. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

दिल्लीकरांनी केले खासदार हेमंत गोडसेंचे कौतुक

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना मदत केल्याने उत्कृष्ट पुरस्कार मिळालेले शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा दिल्लीच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला.

नाशिक : कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना मदत केल्याने उत्कृष्ट पुरस्कार मिळालेले शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा दिल्लीच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला.

खासदार गोडसे नेहेमीच मतदारसंघाबरोबरच दिल्लीच्या कार्यकर्त्यांच्या अडचणीतही धाऊन येतात. त्यामुळे सक्रीय खासदार म्हणून आम्ही सदैव त्यांच्यामागे राहू असे हेमंत गोडसे मित्र मंडळाचे अध्यक्ष नीरज सेठी यांनी यावेळी सांगितले. 

खासदार गोडसे यांना नुकताच कोरोना कालावधीत विविध प्रश्नांवर पाठपुरावा तसेच खासदार निधीतील एक कोटींचा निधी देऊन कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरु केल्याने एका संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात राज्यातील सर्वोत्तम खासदार म्हणून त्यांचे नाव जाहिर केले होते. यासंदर्भात हेमंत गोडसे मित्र मंडळाच्या उत्तर भारतीय शाखेचे अध्यक्ष नीरज सेठी व त्यांच्या सहका-यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांना दिल्लीत त्यांचा सत्कार केला. 

यावेळी खासदार गोडसे म्हणाले, 80 टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. त्यांच्या याच शिकवणीनुसार शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी काम करीत असतो. त्याला अनवुसरूनच मी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. यापुढेही मतदारसंघ व मतदारसंघाबाहेरील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सक्रीय राहीन.      

यावेळी दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 
...

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख