गिरीष महाजन म्हणाले, उद्धव ठाकरेंची फजितीच झालेली आहे  - Girish Mahajan says, Cm Thakre in Confussion | Politics Marathi News - Sarkarnama

गिरीष महाजन म्हणाले, उद्धव ठाकरेंची फजितीच झालेली आहे 

संपत देवगिरे
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील मंदीर भूमिपूजनाचे निमंत्रण आले नाही. कारण आमंत्रण आले असते, तरी ते गेले असते, की नाही याविषयी शंकाच आहे.

नाशिक : बरे झाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण आले नाही. कारण आमंत्रण आले असते, तरी ते गेले असते, की नाही याविषयी शंकाच आहे. कारण सध्या त्यांची फजितीच झालेली आहे, असा टोमणा माजी मंत्री गिरीष महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना मारला आहे. 

अयोध्येतील भूमिपूजनाच्या पार्श्‍वभूमीवर आज श्री. महाजन यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह येथील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. ते म्हणाले, सध्या कोरोना आहे, याची सगळ्यांनाच जाणीव आहे. मात्र सर्व खबरदारी घेऊन भाविकांना धार्मिक कार्यक्रमांसाठी परवानगी दिली पाहिजे होती. नाशिक हे श्रीरामांचे वास्तव्य असलेले शहर आहे. येथे कार्यकर्ते, संस्थांना धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी द्यायला हवी होती. परंतु आज शहरातील सर्व मंदिरे बंद आहेत. धार्मिक संस्था बंद आहेत. हे अतिशय अयोग्य आहे. ही सर्व मंदिरे खुली असायला हवी होती. मात्र प्रशासनाने नागरिकांची अडवणूक केली आहे. 

श्री. महाजन म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या कार्यक्रमाला जाऊ नये, यासाठी त्यांच्या सहकारी पक्षांनी विधाने करण्यास सुरवात केली होती. कॉंग्रेस पक्षाने मुख्यमंत्री ठाकरे यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी भूमिका घेतली होती. दुसरा सहकारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने डोळे वटारून मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला अजिबात जाताच कामा नये, असे म्हटले. त्यात मुख्यमंत्र्यांचा गोंधळ झाला. दोन्ही पक्षांना सांभाळायचे असल्याने त्यांची त्यात चांगलीच फजिती झाली आहे. त्यामुळे बरे झाले, त्यांना निमंत्रण आले नाही. कारण निमंत्रण आले असते, तरी ते गेले असते का? याविषयी मला शंकाच आहे. त्यामुळे निमंत्रण आले नाही, त्यामुळे एक प्रकारे हे चांगलेच झाले. 
... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख