भुजबळ, पाडवी, सत्तार, गुलाबराव हे कमकुवत मंत्री

राज्यात वजनदार मंत्री आपल्या जिल्ह्यात ऑक्सीजन, रेमेडीसेवव्हर मुबलक प्रमाणात उपलब्ध करीत आहेत. परंतु उत्तर महाराष्ट्रात त्याचा तुटवडा आहे. उत्तर महाराष्ट्रातील छगन भुजबळ, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, के. सी.पाडवी हे कमकुवत मंत्री आहेत,.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik-features/future-action-maratha-reservation-will-be-decide-maratha-resrvationजळगाव : राज्यात वजनदार मंत्री आपल्या जिल्ह्यात ऑक्सीजन, रेमेडीसेवव्हर मुबलक प्रमाणात उपलब्ध करीत आहेत. (Remdacivier, Oxigen Available) परंतु उत्तर महाराष्ट्रात त्याचा तुटवडा  आहे. (Shortage in North Maharashtra) उत्तर महाराष्ट्रातील छगन भुजबळ, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, के. सी.पाडवी हे (Chhagan Bhujbal, K. C. Padvi, Abdul Sattar, Girish Mahajan) कमकुवत मंत्री आहेत, असा आरोप भाजप नेते, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी नाव न घेता लगावला आहे.

उत्तर महाराष्ट्रात ऑक्सीजन, रेमेडीसेवव्हर इंजेकशनच्या तुटवड्या विषयी श्री. महाजन यांनी चिंता व्यक्त केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यात मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यात ऑक्सीजंन, रेमेडीसेवव्हरचा मुबलक साठा आहे. ठराविक जिल्ह्यात ऑक्सीजन, रेमेडीसेवव्हर चा मुबलक साठा आहे. इतर जिल्ह्यात त्या मानाने अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी अत्यंत भयावह परिस्थिती आहे.  त्यामुळे मी सांगतो की जे वजनदार मंत्री आहेत ते आपल्या जिल्ह्यात मुबलक प्रमाणात साठा करीत आहेत. बाकीच्या ठिकाणी ठणठणाट आहे. 

उत्तर महाराष्ट्रात नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, धुळ्याचे अब्दुल सत्तार व नंदुरबारचे के. सी. पाडवी हे कमकुवत मंत्री आहेत, असा आरोप त्यांनी या मंत्र्यांचे नाव न घेता केला. त्यांच्या जिल्ह्याच्या परिस्थितीचा उल्लेख मात्र केला. 

दरम्यान महाजन यांनी जळगाव जिल्ह्यात आठवड्याला दोन ऑक्सीजन टँकर देण्याचा निर्णय घेतला आहे. काल त्यांनी एक टँकर जळगावच्या  जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला. त्यानंतर त्यांनी सत्ताधारी मंत्र्यावर टीका केली.
...
 

छत्रपती संभाजी महाराजांच्या मताने पुढील दिशा ठरवू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com