शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ घंटागाडी कर्मचा-यांची बाईक रॅली

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एनटीयूआय संलग्न घंटागाडी कामगार संघटनेसह,किसान सभा व आयटक यांच्या वतीने शहरात बाईक रॅली आयोजित करण्यात आली.
ंBike rally
ंBike rally

नाशिक : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एनटीयूआय संलग्न घंटागाडी कामगार संघटनेसह,किसान सभा व आयटक यांच्या वतीने शहरात बाईक रॅली आयोजित करण्यात आली. शेतकरी आंदोलनावर तोडगा न काढणा-या केंद्र सरकारविरोधात घोषणा देत, लवकर तोडगा वाढावा अन्यथा मोठी रॅली काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

यावेळी संघटनेचे नेते राजू देसले म्हणाले, शेतक-यांच्या विरोधात असलेले केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्यात यावेत. शेतमालाच्या हमीभावाचा कायदा करण्यात यावा आणि कामगारविरोधी कायदे रद्द करण्यात यावेत या प्रमुख मागण्या आहेत. दिल्ली येथे शेतकऱ्यांन वर होत असलेल्या असर्धुर लाठीहल्याचा निषेध आम्ही निषेध करतो. देशात शेतकरी, कामगार विरोधी कायदे केंद्र सरकार करत आहेत. सीएए, एनआरसी यांसारखे कायदे देशाची एकात्मता तोडण्यासाठी केले जात आहेत. त्याचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. मात्र सरकार त्यापासून काहीही धडा घेण्यास तयार नाही. काल मुंबई त हजारो शेतकरी मोर्चा घेऊन गेले राज्य पाल पळून गेले हा शेतकऱ्यांना चा अपमान केला आहे कंगना ला भेटण्यासाठी राज्यपालांना वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांन साठी वेळ नाही. या पुढील काळात शेतकरी कामगार एकत्र येऊन लढा दिला जाईल. 

भाकप शहर सचिव रॅलीचे संयोजन महादेव खुडे यांनी केले. किसान सभा राज्य सचिव राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत रामदास भोंग, दत्तू तुपे, शिवनाथ जाधव, विठ्ठ्ल शिंदे, कैलास मोरे, शरद आहेर, लोटन मराठे, रफिक सैय्यद, नितीन सोनकांबळे, सुभाष गवारे, रवी पगारे, नाना सुर्यवंशी, विश्वास साळवे, बाजीराव सोनवणे, नाना नवर, राहूल अढांगळे, नागेश भोळे, नितीन शिराळ, कच्चेभान विधाते, श्याम प्रधान, शशिभाई उनवणे, राजू देसले यांनी मार्गदर्शन केले.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com