गफ्फार मलिक यांना मरणोत्तर जळगावरत्न पुरस्कार

जळगाव येथील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते, माजी नगसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गफ्फार मलिक यांना महापालिकेतर्फे मरणोत्तर जळगावरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. महापौर जयश्री महाजन यांनी रविवारीही घोषणा केली.
Sarkarnaa Banner
Sarkarnaa Banner

जळगाव : जळगाव येथील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते, माजी नगसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गफ्फार मलिक यांना महापालिकेतर्फे मरणोत्तर जळगावरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. महापौर जयश्री महाजन यांनी रविवारीही घोषणा केली. 

याबाबत महापौर महाजन यांनी सांगितले, की जळगाव महापालिका शहरातील सामाजिक, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करीत असते. त्याच अनुषंगाने दिवंगत सामाजिक कार्यकर्ते गफ्फार मलिक यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर जळगावरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

दिवंगत मलिक यांचे शैक्षणिक क्षेत्रात अँग्लो ऊर्दू हायस्कूल, इकरा हायस्कूल या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलबध करून दिली. मुस्लिम समाजाला शिक्षण क्षेत्रात पुढे घेऊन जाण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या याच कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महापालिकेतर्फे जळगावरत्न पुरस्कार यापूर्वी भवरलाल जैन, डॉ. अविनाश आचार्य, ॲड. उज्ज्वल निकम यांना जाहीर करण्यात आला आहे.  
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com