दादा भुसेंनी तपासलेल्या रुग्णालयाने महापालिकेलाही चुना लावला 

कोरोना रुग्णांकडून अवाजवी बील घेतल्याच्या तक्रारी आल्याने कृषीमंत्री दादा भुसेयांनी तपासणी केली होती. त्या सिक्स सिग्मा व सनराईज हॉस्पिटलच्या अडचणी वाढल्या आहेत. या रुग्णालयांनी बनावट करारनामा करून महापालिकेचा २.२० लाखांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Bhuse Hospital
Bhuse Hospital

मालेगाव : कोरोना रुग्णांकडून अवाजवी बील घेतल्याच्या तक्रारी (complains af extra bill charged to covid patients) आल्याने कृषीमंत्री दादा भुसेयांनी तपासणी केली होती. त्या सिक्स सिग्मा व सनराईज हॉस्पिटलच्या अडचणी वाढल्या (Six Sigma hospital in Trouble) आहेत. या रुग्णालयांनी बनावट करारनामा करून महापालिकेचा २.२० लाखांची फसवणूक केल्याची तक्रार (FIR Ragistered) दाखल करण्यात आली आहे. 

दरम्यान यासंदर्भात संचालक रमनलाल सुराणा यांच्याविरुध्द छावणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिका मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी सिक्स सिम्मा व सनराईज या दोन्ही रुग्णालयांच्या व्यवस्थापनाकडुन अग्निशमन नाहरकत प्रस्ताव सादर केला नव्हता. रुग्णालयाला तसे प्रमाणपत्र देण्यात आले. महापालिकेचे प्रमाणपत्र नसताना संचलकांनी नाहरकत दाखल्यात बनावटी दुरुस्त्या केल्या. मुळ दाखल्यावर सिक्स सिग्मा व सनराईज हॉस्पिटल असे नाव टाकुन बनावट नाहरकत दाखला तयार केला असे तक्रारीत म्हटले आहे. 

दरम्यान महापालिकेच्या नगरविकास विभागाने मालमत्तेचा अनधिकृत वापर व मुळ वापरात बदल केल्या प्रकरणी कलम ५२ व ५३ अन्वये नोटीस बजावली आहे. फसवणुक प्रकरणी मुख्य लेखापरिक्षक राजू खैरनार यांच्या तक्रारीवरुन गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.

सनराईज व सिक्स सिग्मा हॉस्पिटल इमारतीच्या मालमत्ता कराच्या आकारणीबाबत मिळकत मालकाशी केलेला लिव्ह अँड लायसन्स (भाडे) करारनामा संचालकांनी प्रभाग एकच्या अधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यात ११ महिन्यांसाठी १.११ लाख रुपये लायसन्स फी दर्शविण्यात आली. प्रत्यक्षात करारनामा व महापालिकेकडे सादर करारनाम्यात तफावत आढळली.  त्यामुळे महापालिकेचे सुमारे सव्वा दोन लाख रुपये कराचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

महापालिकेचे मुख्य लेखापरिक्षक श्री. खैरनार यांनी लेखा परिक्षणाची नोटीस बजावल्यानंतर सिक्स सिग्मा रुग्णालयाने सुमारे ७० रुग्णांची माहिती व लेखा परिक्षण अहवाल दिला. त्याची चौकशी सुरु आहे. महापालिका प्रशासन संबंधित रुग्णांशी संपर्क साधून बिले पाठविण्याची किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करणार आहे. यानंतर चौकशी अहवाल सादर केला जाईल. या कारवाईनंतर सिक्स सिग्मा रुग्णालयास महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी अपात्र ठरविल्याचे समजते. मात्र त्यास दुजोरा मिळाला नाही. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com