जिल्ह्यात चौथ्यांदा कोरोनाचे पन्नासपेक्षा जास्‍त बळी

नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत असताना, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूचे सत्र अद्याप सुरूच आहे. शनिवारी (ता. २२) कोरोना मृत्‍यूचा पुन्‍हा एकदा विस्‍फोट झाला असून, जिल्ह्यात दिवसभरात ५८ बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे.
CORONA
CORONA

नाशिक : नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत असताना, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूचे सत्र (Covid19 deaths are continues) अद्याप सुरूच आहे. शनिवारी (ता. २२) कोरोना मृत्‍यूचा पुन्‍हा एकदा विस्‍फोट झाला असून, जिल्ह्यात दिवसभरात ५८ (58 deaths on saturday) बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. चौथ्यांदा दिवसभरातील मृतांची संख्या पन्नासपेक्षा (fourth time number crossed 50 in Nashik) अधिक राहिली. दरम्यान, सर्वाधिक ३९ मृत्‍यू ग्रामीण भागात झाले असून, यात येवला तालुक्‍यातील आठ मृतांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अद्यापही आटोक्‍याबाहेर आहे. शनिवारी झालेल्‍या ५८ मृ‍त्यूमध्ये नाशिक शहरातील अठरा, नाशिक ग्रामीणमधील ३९, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील एका मृताचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक आठ मृत्यू येवला तालुक्‍यातील, तर निफाड तालुक्‍यातील सहा, दिंडोरी तालुक्‍यातील पाच, मालेगाव ग्रामीणमधील चार मृतांचा समावेश आहे. त्र्यंबकेश्‍वर, नांदगाव तालुक्‍यांतील प्रत्‍येकी तीन, नाशिक तालुक्‍यात दोन, तर सिन्नर, सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड तालुक्‍यांतील प्रत्‍येकी एकाचा मृतांमध्ये समावेश आहे. 

दरम्‍यान, शनिवारी दिवसभरात एक हजार २२२ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. यात नाशिक शहरातील ४५६, नाशिक ग्रामीणमधील ७२६, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील चाळीस मृतांचा समावेश आहे. एक हजार ३१९ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली असून, नाशिक शहरात ७५८, नाशिक ग्रामीणमध्ये ५१२, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात ४९ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. 

सायंकाळी उशिरापर्यंत चार हजार ५२९ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा कायम होती. यात नाशिक ग्रामीणमधील तीन हजार १२५, नाशिक शहरातील एक हजार २६१, तर मालेगावच्‍या १४३ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दोन हजार ६५ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार ९२८ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात एक, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सात रुग्‍ण, तर नाशिक ग्रामीणमध्ये १०८ व मालेगावमध्ये २१ रुग्‍ण दाखल झाले आहेत. 
-- 
यापूर्वीचे पन्नासपेक्षा जास्त मृत्यू 
तारीख मृतांची संख्या 
२० एप्रिल ५७ 
२१ एप्रिल ९० 
२२ एप्रिल ५५ 

 ...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com