पंजाबच्या आंदोलनाने महाराष्ट्राचा धान्यपुरवठा थांबला ! - Foodgrain supply disturb due to Punjab Farmers agitation | Politics Marathi News - Sarkarnama

पंजाबच्या आंदोलनाने महाराष्ट्राचा धान्यपुरवठा थांबला !

संपत देवगिरे
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पंजाब मधून येणारा अन्नधान्याचा पुरवठा थांबलेला आहे. हे आंदोलन असेच सुरु राहिल्यास येणा-या दिवाळीत देशातील विविध राज्यात स्वस्त धान्य दुकानांतून होणारा अन्नधान्याचा पुरवठा प्रभावीत होण्याची भिती आहे.

नाशिक : पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पंजाब मधून येणारा अन्नधान्याचा पुरवठा थांबलेला आहे. हे आंदोलन असेच सुरु राहिल्यास येणा-या दिवाळीत देशातील विविध राज्यात स्वस्त धान्य दुकानांतून होणारा अन्नधान्याचा पुरवठा प्रभावीत होण्याची भिती आहे. त्यामुळे आगामी दिवाळीवर कृषीबालीचे सावट आहे.

दरम्यान असे असले तरी महाराष्ट्रात येणाऱ्या काळात सणासुदीच्या वेळी महाराष्ट्रात अन्नधान्य चा तुटवडा भासू देणार नाही अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक  संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

श्री भुजबळ म्हणाले, पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वेच्या पटरीवर आंदोलन सुरू केले. त्यामुळे महाराष्ट्राला आणि अन्य राज्यांना पंजाब मधून होणारा अन्नधान्याचा पुरवठा थांबलेला आहे. याबाबत नाशिकच्या काही अधिकाऱ्यांनी देखील नाशिक मध्ये २ मालगाड्या गहू आणि २ मालगाड्या तांदुळाची गरज असल्याची मागणी केली आहे. ते लक्षात घेता अन्न व नागरी पुरवठा विभागाने तातडीने उपाययोजना करून भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI) अतिरिक्त साठ्यातून मदत मागितली आहे. त्याप्रमाणे भारतीय अन्न महामंडळाकडून देखील पुरवठा केला जाणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

दिवाळीत टंचाई नाही : भुजबळ
भारतीय अन्न महामंडळाकडे स्वतःकडे १०.९४ लाख मेट्रिक टन गहू आणि ४.८९ लाख मेट्रिक टन तांदूळ याचा अतिरिक्त साठा करून ठेवला आहे. भारतीय अन्न महामंडळाने आंध्रप्रदेश राज्याकडून तांदूळ आणि मध्यप्रदेश राज्याकडून गहू याची अतिरिक्त उचल सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला यातूनच पुरवठा होणार आहे. येणाऱ्या काळात असलेली दिवाळी आणि दसरा या सणांमध्ये कोणत्याही शिधापत्रिका धारकांना अन्न धान्यांचा तुटवडा होणार नाही असेही भुजबळ यांनी सांगितले.
...
 

https://scontent.fpnq1-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख