प्रेसच्या सिक्युरिटीला छेदत ५ लाखांच्या नोटांची चोरी  - five lacs currancy notes theft from Securty press, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

प्रेसच्या सिक्युरिटीला छेदत ५ लाखांच्या नोटांची चोरी 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जुलै 2021

केंद्रीय औद्योगिक सुरक्ष बलाची अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या नोट छपाई कारखान्यातून ५ लाखांच्या नोटांची चोरी झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. नोटा आणि सुरक्षा व्यवस्था दोघांचा आढावा घेण्याचे काम रात्रंदिवस सुरु झाले आहे. अद्याप याबाबत काहीच धागेदोरे न मिळाल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत.

नाशिक : केंद्रीय औद्योगिक सुरक्ष बलाची अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या नोट छपाई कारखान्यातून ५ लाखांच्या नोटांची चोरी झाली आहे. (Five lacs notes theft from high security CNP of Nashik) त्यामुळे खळबळ उडाली आहे. नोटा आणि सुरक्षा व्यवस्था दोघांचा आढावा घेण्याचे काम रात्रंदिवस सुरु झाले आहे. (Security agencies taking review of lapses) अद्याप याबाबत काहीच धागेदोरे न मिळाल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. 

भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या नियंत्रणातील येथील चलार्थ पत्र मुद्रणालयात चोरी झाली आहे. चलनी नोटा छपाईच्या चलार्थपत्र मुद्रणालयातील सुरक्षाव्यवस्था भेदून त्यातून सुमारे पाच लाखांच्या नोटा गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या घटनेने मुद्रणालयात खळबळ उडाली आहे. 

चलार्थपत्र मुद्रणालयातील नोटा छपाईच्या कारखान्यातील या गहाळ नोटांबाबत काही दिवसांपासून गोपनीयरीत्या चौकशी सुरू असलेल्या या प्रकारणी सोमवारी मुद्रणालयातील अधिकारी उपनगर पोलिस ठाण्यात पोचले तेव्हा वाचा फुटली. यात उशिरापर्यत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. 

चलार्थपत्र मुद्रणालयात देशाचे चलन छापले जाते. वर्षासाठी दोन ते अडीच हजार दशलक्ष नोटा छपाई करणाऱ्या या कारखान्याने नोट छपाईचे अनेक उच्चांक केले आहेत. देशातील नोटाबंदीनंतर उद्‌भवलेल्या चलनटंचाईच्या काळात दिवसरात्र काम करून ज्या कारखान्याने देशाची कौतुकाची शाबासकी मिळविली त्याच मुद्रणालयात चोरीचा धक्कादायक प्रकार पुढे आल्याने प्रेसच्या लौकिकाला धक्का बसला आहे. दरम्यान, हा विषय आर्थिक सुरक्षेशी संबंधित असल्याने मुद्रणालय प्रशासकीय यंत्रणेसोबत पोलिस विभागानेही मौन बाळगले आहे. 
....
हेही वाचा...

हवामान बदलावे तसे नाना पटोले बदलतात!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख