जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष परवेज कोकणींविरोधात गुन्हा दाखल

खरेदीखतासाठी बनावट सही व कागदपत्र तयार करून, फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष परवेज युसूफ कोकणी यांसह चौघांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Parvez Kokani
Parvez Kokani

नाशिक : खरेदीखतासाठी बनावट सही व कागदपत्र तयार करून, फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष परवेज युसूफ कोकणी यांसह चौघांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात तक्रारदार इमरान गौस यांच्या तक्रारीवरुन कोकणींसह महादू भावदू नारळे, एम. एस. मिर्झा, ॲड. ए. आय. शेख या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  श्री. कोकणी (वय ४०, रा. कोकणीपुरा, जुने नाशिक) यांनी २०१३ मध्ये वडील आणि पाच भावांनी मौजे नाशिक शिवारातील ५११/१०/२ पैकी प्लॉट क्रमांक दोनचे क्षेत्र १०३९.०६ चौरस मीटर टीपी स्कीम दोननुसार अंतिम भूखंड क्रमांक ३४ मिळकत खरेदी केली होती. १७ ऑगस्ट २०१७ ला सिटीझन कंस्ट्रक्शनचे निसार खान यांना विक्री केली. सहाय्यक दुय्यम निबंध दोन आणि तीन यांच्याकडे खरेदीखत केल्याची नोंदणीही आहे. श्री. खान यांनी खरेदीनंतर महापालिकेच्या आवश्‍यक परवानगी घेऊन बांधकाम सुरू केले.

दरम्यान, परवेज कोकणी यांनी मालकी नसताना त्या जागेचे खरेदीखत लिहून मिळावे, यासाठी ५ फेब्रुवारी २०२० ला सिव्हिल जज सीनिअर डिव्हिजन यांच्याकडे विशेष दावा दाखल केला. याबाबत माहिती मिळाल्याने तक्रारदारांनी दाव्याच्या कागदपत्रांची छायांकित पत्र मिळावी, यासाठी न्यायालयात अर्ज केला. कागदपत्र मिळाल्यानंतर त्या दस्ताऐवजाची मुंबई येथील दस्ताऐवज परीवेक्षक निशा मेमन यांच्याकडून तपासणी केली. ते दस्ताऐवज सही कॉपी पेस्ट करून (बनावट) केल्याचा दाखला मिळाला. बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याने तक्रार इमरान कोकणी यांनी सरकारवाडा पोलिसांत परवेज कोकणी, साक्षीदार म्हणून सही करणारे महादू नारळे, एम. एस. मिर्झा व ॲड. ए. आय. शेख यांच्याविरुद्ध तक्रार दिली.
...
दस्ताऐवज परीवेक्षक कार्यालयात तपासणीनंतर कागदपत्रे बनावट असल्याची माहिती प्राथमिक तपासात बाहेर आली. त्यानुसार पुढील कारवाई करीत असून, सखोल चौकशी सुरू आहे. - नाईद शेख, पोलिस उपनिरीक्षक
....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com