रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत कोरोनाशी लढाई सुरू राहणार

कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जाते. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या मोठी आहे. या परिस्थितीत कोरोना विरोधात लढण्यासाठी सर्वांचाच सहभाग आवश्यक आहे. ही रुग्णसंख्या शूण्यावर येईपर्यंत कोरोनाशी लढाई सुरुच राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mulakhati-nashik/delhi-government-interested-see-maratha-cast-problem-maratha-issueनाशिक : कोरोनाची तिसरी लाट (Third Wave of Corona) येणार असल्याचे बोलले जाते. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या मोठी आहे. या परिस्थितीत कोरोना विरोधात लढण्यासाठी (Fight against Covid19) सर्वांचाच सहभाग आवश्यक आहे. ही रुग्णसंख्या शूण्यावर येईपर्यंत कोरोनाशी लढाई सुरुच राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्था संघटनांनी पुढे यायला हवे असे आवाहन आपण करत असून त्यादृष्टीने येथील डॅा. विजय पवार, डॅा. स्वप्निल इंगळे यांनी उभारलेल्या ब्रीचकॅण्डी हॉस्पिटल कोविड केअर सेंटरचे अनावरण श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले. या रुग्णालयात उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने दिलासा मिळणार आहे.

यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, ब्रीचकॅण्डी हॉस्पिटल कोविड केअर सेंटर या चांगल्या रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. हा अतिशय चांगला उपक्रम आहे. अत्यंत कमी वेळात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. कोरोना रुग्णांची सेवा करण्यास वाहून घेणारे हे हॉस्पिटल आहे. कोरोना रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत ही लढाई सुरू राहणार आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध झाल्यात तर कोरोना विरुद्ध लढा देण्यास मोठी मदत होणार असल्याचे

त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, कोरोनाने मोठयाप्रमाणात हातपाय पसरविण्यास प्रारंभ केल्याने सामाजिक बांधिलकी जोपासण्यास अनेक मदतीचे हात पुढे आलेत. अनेकांनी विविध मार्गाने त्यासाठी पुढाकार घेतला. त्यात हे ३०० खाटांचे कोरोना सेंटर उभारून कोरोनाविरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, हंसराज वडघुले, हॉस्पिटलचे संचालक डॉ. विजय पवार, डॉ. स्वप्निल इंगळे, नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांसह डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

दिल्लीश्वरांना मराठा समाजाचा अंत पाहण्यात स्वारस्य दिसते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com