कोविड लस घोतल्यावर सुरक्षित वाटतेय ! - feel secured after covid-19 vaccination, Collector Suraj Mandhare | Politics Marathi News - Sarkarnama

कोविड लस घोतल्यावर सुरक्षित वाटतेय !

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

कोविड लस पूर्णपणे सुरक्षित असून, लस घेतल्यानंतर कोणताही परिणाम होत नाही. स्वतः टोचून घेतल्यानंतर सुरक्षित झाल्याची भावना आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

नाशिक : कोविड लस पूर्णपणे सुरक्षित असून, लस घेतल्यानंतर कोणताही परिणाम होत नाही. स्वतः टोचून घेतल्यानंतर सुरक्षित झाल्याची भावना आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.  

येथील महापालिकेच्या नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये जिल्हाधिकारी  मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदींनी लस टोचून घेतली. या वेळी त्यांनी रुग्णालयातील कर्मचारी, उपस्थित लोकप्रतिनिधी यांच्या कामाचे कौतुक करीत त्यांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहीत केला.  

लस घेतल्यावर महापालिका आयुक्त जाधव म्हणाले, की लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम, गैरसमज, भीती होती; परंतु ही लस पूर्ण सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर कोरोना संपला असे न समजता नियमित मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स राखणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, अशी काळजी घेणे आवश्यक आहे. लस घेतल्यानंतर या सर्वांना अर्धा तास निरीक्षण कक्षात निगराणीखाली ठेवण्यात आले. या वेळी मी कोविड लस घेतली आहे, लस पूर्णपणे सुरक्षित आहे, असा संदेश देणारी फ्रेम हातात घेऊन त्यांनी संदेश दिला. 

या वेळी प्रभाग सभापती जयश्री खर्जुल, नगरसेवक सूर्यकांत लवटे, जगदीश पवार, रमेश धोंगडे, महापालिका विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेणकर, डॉ. राजेंद्र भंडारी, जितेंद्र धनेश्वर, डॉ. रत्नाकर पगारे, डॉ. प्रेरणा शिंदे, डॉ. शलाका बागूल, डॉ. स्नेहल बागडे, आशा मुठाळ, डॉ. शुभांगी रत्नपारखी, डॉ. विशाल जाधव, डॉ. शिल्पा काळे, डॉ. दीपाली पाटील, डॉ. आरेश पलोड, डॉ. अर्चना बोधले, डॉ. प्रज्ञा पाटील आदी उपस्थित होते.  
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख