शासनाचे स्पष्टीकरण...कोरोनाचे उपचार मोफत तर प्रक्रिया सोपी ! - FAQ about COVID19 treatment about MPJAY | Politics Marathi News - Sarkarnama

शासनाचे स्पष्टीकरण...कोरोनाचे उपचार मोफत तर प्रक्रिया सोपी !

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ कोरोनासह 996 उपचारांसाठी राज्यातील सर्व नागरिकांना मिळतो. या संदर्भात अडचणी आल्यास 155388 किंवा 18002332200 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

नाशिक : राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ कोरोनासह 996 उपचारांसाठी राज्यातील सर्व नागरिकांना मिळतो. या संदर्भात अडचणी आल्यास 155388 किंवा 18002332200 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे राज्य शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

सध्याच्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक नागरिकांना अडचणी येतात. विविध प्रश्‍न पडतात. त्याची उत्तरे किंवा समाधान कुठे होईल, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे असतो. यासंदर्भात आरोग्य विभागाने शंकांचे निरसन करणारे "एक काय करावे, काय करु नये' याचे स्पष्टीकरण केले आहे. त्यातून कोरोनाग्रस्त रुग्ण, त्याचे नातेवाईक व परिचितांच्या समस्यांचे निराकरण होणार आहे. 

एकंदर अठरा शंका व त्यांची उत्तरे या परिपत्रकात आहेत. यातील सर्वात ठळक स्पष्टीकरण म्हणजे, एखाद्या व्यक्तीकडे कागदपत्र नसल्यास रुग्णालयाने दुरध्वनीद्वारे मंजुरी घेऊन उफचार सुरु करावेत. शीधापत्रिका अथवा वैद्यकीय कागदपत्र व छायाचित्र असलेले ओळखपत्र एव्हढे कागदपत्र ग्राह्य मानले जातील. तहसीलदाराचा दाखला अथवा अधिवास प्रमाणपत्रासह आणिबाणीच्या स्थितीत व्हाटस्‌ऍप द्वारे शीधापत्रिकेची प्रत पाठविली तरीही तीचा स्विकार होते. अथवा सात दिवसांच्या कालावधीत ती पूर्तता करावी, अशा सूचना आहेत. महाराष्ट्राचा रहिवासी नसलेल्या नागरिकाला देखील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास मोफत उपचार मिळतात. 

"व्हेंटिलेटर'सह उपचार मोफत 
गंभीर अवस्थेतील कोरोना विषाणू बाधित रुग्णांना व्हेंटिलेटरसह व व्हेंटिलेटरविना वीस पॅकेजेसखाली उपचार मिळत आहेत. 

दिड लाखांपर्यंतचे उपचार 
या योजनेंतर्गत उपचारास परवानगी मिळाल्यावर जास्त कालावदी लागला, तरीही किंवा पॅकेजेचा कालावधी संपला तरीही उपचार पूर्ण झाला नसेल तर दिड लाख रुपये संपेपर्यंतचा उपचाराचा कालावधी लांबवता येतो. 

फोन करुन उपचारास परवानगी 
कुटुंबातील सर्व सदस्य रुग्णालयात दाखल असल्यास, अशा स्थितीत कागदपत्र नसले तरीही "इमर्जन्सी टेलीफोनिक इंटिमेशन' सुविधा आहे. त्यात फोन करुन उपचार सुरु करता येतात. लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत लाभार्थी कागदपत्र सादर करु शकतो. 

रुग्णाची चाचणी मोफत 
सर्व शासकीय रुग्णालयांत कोरोनाची मोफत चाचणी केली जाते. कोरोना उपचाराचा समावेश योजनेत असल्यास व पूर्वपरवानगी मिळाल्यास कोरोना चाचणीचा खर्च पॅकेजमध्ये अंतर्भूत असते. 

महागडी इंजेक्‍शन नाही 
या योजनेतून उपचार सुरु असताना महागडी इंजेक्‍शन्स आणावी लागल्यास त्याचा खर्च रुग्णास करावा लागेल. तसेच केवळ कोरोनाचा संशयित रुग्ण असल्यास, परंतु कोणतिही लक्षमे माहीत किंवा सौम्य लक्षणे असतील तर या योजनेमध्ये त्यासाठी कोणतेही पॅकेज उपलब्ध नाहीत. रुग्णास श्‍वास घेण्यास त्रास होत नसेल व रुग्ण विलगीकरण किंवा अलगीकरण कक्षात असल्यास त्यालाही लाभ दिला जात नाही. 

कोरोना रुग्णालयांत उपचार 
या योजनेचा लाभ एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेतील अंगीकृत रुग्णालयांमध्ये तसेच कोविड-19 उपचार केंद्रात मिळेल. सर्व खाजगी व सरकारी अंगीकृत रुग्णालयांमध्ये 120 शासकीय राखीव उपचार केले जात आहेत. त्यासाठी जिल्हा समन्वयक किंवा विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क करता येतो. 

केंद्र सरकारचे हेल्थ मिशन 
केंद्र शासनाच्या हेल्थ मिशन (सीजीएचएस) चे 67 पॅकेजेस सर्व अंगीकृत खाजगी रुग्णालयात मोफत उपलब्ध करण्यात आलेली आहेत. त्यात बाळंतपण, सिझेरिअन, शश्‍त्रक्रिया आदी उपचारांचा समावेश आहे. 

अंगीकृत नसलेली रुग्णालये 
या योजनेमध्येंगीकृत नसलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णाला दाखल करुन घेत नसल्यास, जिल्हा शल्य चिकित्सक, तहसीलदार किंवा उप जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अदिक्षक अथवा शहरी भागात महापालिका अधिकाऱ्याशी संपर्क करावा. 
... 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख