फडणवीस म्हणाले, `गुपकर` गटाच्या प्रश्नावर कॅाग्रेसला रोज उघडे पाडू - Fadanvis says no article 370 again in any case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

फडणवीस म्हणाले, `गुपकर` गटाच्या प्रश्नावर कॅाग्रेसला रोज उघडे पाडू

संपत देवगिरे
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमध्ये सत्तर वर्षांच्या संघर्षानंतर 370 वे कलम रद्द करुन जम्मू, काश्मीर आणि लदाख हे तीन केंद्र शासीत प्रदेश निर्माण झाले. हा भाग देशाचा अविभाज्य घटक बनला आहे. मात्र गुपकर गटाच्या माध्यमातून देशविरोधी शक्ती याविरोधात एकत्र येत आहे. त्यात कॅाग्रेस सहभागी झाली. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी, असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमध्ये सत्तर वर्षांच्या संघर्षानंतर 370 वे कलम रद्द करुन जम्मू, काश्मीर आणि लदाख हे तीन केंद्र शासीत प्रदेश निर्माण केले. हा भाग देशाचा अविभाज्य घटक बनला आहे. मात्र `गुपकर` गटाच्या माध्यमातून देशविरोधी शक्ती याविरोधात एकत्र येत आहेत. त्यात कॅाग्रेस सहभागी झाली. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी, असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

श्री. फडणवीस म्हणाले, काश्मीरमध्ये विविध राजकीय पक्ष एकत्र येऊन त्यांनी गुपकर गट स्थापन केला आहे. त्यात देशातील सर्वात ज्येष्ठ व नॅशनल कॅान्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुला यांनी चीनच्या मदतीने पुन्हा 370 वे कलम लागू करण्याची भूमिका मांडली. पीडीपीच्या नेत्या मुफ्ती मेहबूबा यांनी आम्ही काश्मीरमध्ये फक्त काश्मीरचाच झेंडा लावू. भारतीय ध्वज फडकू देणार नाही. प्रसंगी पाकिस्तानची देखील या कामासाठी मदत घेतली जाईल. पाकीस्तानची भूमिका काश्मीर पाकिस्तानमध्ये विलीन करावा अशी आहे. थोडक्यात सर्व विघटनवादी संघटनांना बरोबर घेऊन त्यांना हे काम करायचे आहे. त्यात कॅांग्रेस पक्ष देखील सहभागी झाला आहे. त्यांची भूमिका या विषयावर काय आहे, ती त्यांनी जाहीर करावी. विशेषतः कपिल सिब्बल यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे. अन्यथा अशा प्रकारे देशविघातक शक्तींशी हातमिळवण करणारा कॅाग्रेस पक्ष व त्यांच्या नेत्यांना आम्ही रोज प्रश्न विचारून जनतेसमोर उघडे पाडू.

एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी पीडीपी बरोबर आम्ही होतो, तेव्हा त्या पक्षाच्या नेत्या मुफ्ती मेहबूबा यांची वेगळी भूमिका घेण्याची हिंमत होत नव्हती. आमचा त्यांच्यावर दबाब होता. वेळ आल्यावर आम्ही फक्त पीडीपीला नव्हे तर सरकार देखील सोडले. मात्र कॅांग्रेस पक्ष यासंदर्भात मौन आहे. गुपकर गट हा देशविरोधी शक्तींचा गट आहे. या शक्ती एकत्र येऊन देशाच्या भूमिकेला आव्हान देऊ पहात आहेत. या देशातील जनता ते कदापी स्विकारणार नाही. देशात पुन्हा कधीही 370 कलम लागू केले जाणार नाही. तसा प्रयत्न या देशातील जनता हाणून पाडेल.   

वीज बिलांवर विश्वासघात
श्री. फडणवीस म्हणाले. कोरोनाच्या लॅाकडाऊन कालावधीत जनतेला प्रचंड वीज बीले आली आहेत. ही बीले माफ करु असे सरकारने सांगतिले होते. मात्र आता त्यांनी घुमजाव केले. खरे तर पैशांची उपलब्धता करण्याचे विविध मार्ग आहेत. मात्र उर्जामंत्री नितीन राऊत यांनी खरी माहिती दिली जात नसावी. त्यामुळे जनतेच्या माथी वीजेची वाढीव बीले मारली जात आहेत. भाजप या प्रश्नावर सरकारला स्वस्थ राहू देणार नाही. 
....
 

https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख