फडणवीस साहेब तुमची बार्गेनिंग पॅावर वापरा! - Fadanvis kindly use your bargaining Power maratha issue, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

फडणवीस साहेब तुमची बार्गेनिंग पॅावर वापरा!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

मराठा समाजाला न्याय देण्यासाठी फडणवीस सरकारने स्वतंत्र एसईबीसी प्रवर्ग तयार केला होता. दुर्दैवाने तो सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. मराठा समाज मागास नाही असा निर्णय दिला आहे. हा मुद्दा निकाली काढण्यासाठी तज्ञांनी सुचविलेल्या पर्यायांचा विचार करून कार्यवाही करावी, अशी मागणी सकल मराठा समाजातर्फे करण्यात आली आहे. 

नाशिक : मराठा समाजाला न्याय देण्यासाठी फडणवीस सरकारने स्वतंत्र एसईबीसी प्रवर्ग तयार केला होता. (Special SEBC category create by Fadanvis Government) दुर्दैवाने तो सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. मराठा समाज मागास नाही असा निर्णय दिला आहे. )S.C. Cancel that category) हा मुद्दा निकाली काढण्यासाठी तज्ञांनी सुचविलेल्या पर्यायांचा विचार करून कार्यवाही करावी, अशी मागणी सकल मराठा समाजातर्फे (Sakal Maratha community) करण्यात आली आहे. 

यासंदर्भात काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यासंदर्भात यानंतर विविध मान्यवरांनी हा मुद्दा निकाली काढण्यासाठी विविध पर्याय सुचवले आहेत.  त्याची तातडीने कार्यवाही करावी असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला. त्यासाठी सरकारकडे विरोधी पक्षनेत्याची बार्गेनिंग पॅावर वापरावी, अशी विनंती केली. 
यावेळी पदाधिकारी म्हणाले, सकल मराठा समाजाच्या प्रलंबीत असलेल्या प्रश्नांविषयी आपण ज्ञात आहात. किंबहूना या समाजाच्या परिस्थितीविषयी आपण सखोल अभ्यास केलेला असल्यामुळे आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मराठा समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने स्वतंत्र एसईबीसी प्रवर्ग तयार करून विधीमंडळात कायदाही संमत करून घेतला होता.

केंद्र सरकारच्या १०२ व्या घटना दुरूस्ती हा कळीचा मुद्दा ठरत असल्याचेही निदर्शनास येत आहे, या शिवाय ३३८ब, ३४२ अंतर्गत प्रक्रिया राबविण्याच्या सुचना पुढे येत आहेत. आमच्या माहितीनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे असेल आणि त्यासाठी या सुचित पर्यायांचा वापर करायचा असेल तर महाराष्ट्र विधानसभेचा प्रदिर्घ अनुभव, अभ्यासू राजकारणी आणि सक्षम विरोधी पक्षनेता तसेच केंद्र सरकारमधील जेष्ठांचा विश्वासू म्हणून आपण महत्वाची भुमिका बजावू शकता.असा आमचा विश्वास आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही आपणास केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मुख्य समन्वयकाची भुमिका बजावून मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झालेली दरी सांधण्यासाठी सेतू म्हणून काम करावे. राज्य सरकारने छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली समाजासोबत झालेल्या बैठकीत २१ दिवसात त्या पाच मागण्या पुर्ण करण्याविषयी आश्वासीत केले आहे. यासंदर्भात आपण विरोधी पक्षनेत्याच्या अधिकारातील बार्गेनिंग पॅावर वापरून राज्य सरकार कडून हे आश्वासनाची पुर्तता करून घ्यावी.

यावेळी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर, छावा क्रांतिवीर सेनेचे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष उमेश शिंदे, विजय खर्जुल, अशिष अहिरे, योगेश गांगुर्डे, वैभव दळवी, माधवी पाटील आदी उपस्थित होते. 
...
हेही वाचा...

भुजबळांच्या कोपरखळ्यांनी देवेंद्र फडणवीसांना ठसका?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख