Ex MLC J. U. Thakre no more | Sarkarnama

शिक्षक नेते, माजी आमदार जयवंतराव ठाकरेंचे निधन 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 जुलै 2020

समाजवादी नेते आणि शिक्षक लोकशाही आघाडीचे (टी. डी. एफ.) वरिष्ठ नेते माजी आमदार जयवंतराव उत्तमराव उर्फ जे. यू. नाना ठाकरे (वय 74) यांचे आज येथे निधन झाले.

नाशिक : समाजवादी नेते आणि शिक्षक लोकशाही आघाडीचे (टी. डी. एफ.) वरिष्ठ नेते माजी आमदार जयवंतराव उत्तमराव उर्फ जे. यू. नाना ठाकरे (वय 74) यांचे आज येथे निधन झाले.

गेले दोन महिने त्यांच्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होता. त्यातच त्यांचे आज निधन झाले. राज्यातील शिक्षक चळवळीत त्यांना विशेष स्थान होते. शिक्षक चळवळीत प्रदिर्घ काळ ते सक्रीय होते. 1996-2002 या कालावधीत ते नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेचे सदस्य होते. साक्री येथील तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी, राष्ट्र सेवा दलाचे विश्‍वस्त आणि अध्यक्ष, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे अध्यक्ष, साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे संघटक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. केजी टू पीजी मोफत व गुणवत्तापुर्ण शिक्षण यावर त्यांचा सतत भर राहिला. पुरोगामी चळवळ रुजविण्यासाठी ते अखेरपर्यंत सक्रीय होते. त्यांच्या निधनानंतर विविध शिक्षक संघटनांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

त्यांच्या पश्‍चात दोन मुले आहेत. त्यांच्यावर नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 
... 
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख