नाशिक : राज्याचे माजी परिवहन व राजशिष्टाचार मंत्री डॉ. प्रशांत हिरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे यंदाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन कळमकर यांनी पत्राद्वारे ही माहिती कळविली आहे.
पुणे येथे बुधवारी विद्यापीठाच्या ७२ व्या वर्धापदिनदिनी होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्याचे वितरण होईल. यावेळी जेष्ठ समाजसेवक, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे प्रमुख अतिथी असतील. कुलगुरू डॉ. करमळकर आणि विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार उपस्थित राहतील. पुरस्कारार्थी माजीमंत्री डॉ. हिरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दरवर्षी विद्यापीठाच्या वर्धापनदिनाच्या औचित्त्याने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार देण्यात येतो.
माजी मंत्री डॉ. प्रशांत हिरे यांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात देत असलेल्या प्रदीर्घ व उल्लेखनिय योगदानाबद्दल विद्यापीठातर्फे यंदाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ. हिरे महात्मा गांधी विद्यामंदीर आणि आदिवासी सेवा समिती या संस्थांचे सरचिटणीस आहेत. या संस्थेच्या राज्याच्या विविध बागात विविध शाळा, महाविद्यालये आहेत. विशेषतः आदिवासी भागात आश्रमशाळांद्वारे त्यांनी दिर्घकाळ शैक्षणीक प्रसाराचे काम केले आहे.
...

