गिरीश महाजनांच्या कारला अपघात, महाजन सुरक्षीत मात्र... - Ex Minister of BJP Girish Mahajan car accident | Politics Marathi News - Sarkarnama

गिरीश महाजनांच्या कारला अपघात, महाजन सुरक्षीत मात्र...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

माजी आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांच्या कारचा आज अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार आरोग्य कर्मचारी त्यांच्या कारवर धडकल्याने तो गंभीर जखमी झाला. 

पाचोरा : माजी आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांच्या कारचा आज अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार आरोग्य कर्मचारी त्यांच्या कारवर धडकल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.

यासंद्रर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा (जळगाव) तालुक्‍यातील लोहरी- वरखेडी दरम्यानच्या रस्त्यावर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या कारची व दुचाकीची धडक झाली. या अपघातात वरखेडी (ता पाचोरा) प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. अपघातानंतर लगेचच माजी मंत्री महाजन यांनी स्वतः लक्ष घालून त्या जखमीच्या उपचाराची व्यवस्था केली. त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमीवर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी की,  माजी मंत्री महाजन वरखेडी- लोहारी रस्त्याने जामनेर कडे जात होते. यावेळी वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी बी. सी. पवार यांच्या दुचाकीची व कारची धडक झाली. आमदार महाजनांच्या कारने दुचाकीला धडक दिली असे म्हटले जाते. मात्र असे असले तरी श्री. पवार हे  दुचाकीने जात असताना कारच्या मागील बाजुने कारवर धडकले. या अपघातात ते मोटार सायकलवरून रस्त्यावर खाली पडले. त्यात ते जखमी झाले, असे श्री. महाजन यांनी स्पष्ट केले.

माजी मंत्री महाजन यांनी जखमी पवार यांना आपल्या कारमधून पाचोरा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कर्मचारी पवार यांच्या डोक्याला  मार लागला असून हातापायांना खरचटले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पिंपळगाव हरेश्वर  पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. हा किरकोळ स्वरुपाचा अपघात असून जखमीची प्रकृती सुधारत आहे. मात्र हाय प्रोफाईल व्यक्तीच्या वाहनाचा अपघात झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
...
 

https://scontent.fpnq7-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख