नाशिक : `कोरोना`चा विळखा घट्ट होत असताना केंद्र सरकारने जाहिर केलेल्या लॉकडाऊनमुळे बिहारी मजूर गावी परतले. आता या कामगारांना कामावर न येण्यास निवडणुकीचे निमित्त मिळाले आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याने सध्या औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांसह बांधकाम क्षेत्र हवालदील झाले आहे.
ज्या ज्या शहरांत औद्योगिक वसाहतींत उत्तर भारतीय कामगार आहेत. त्या त्या भागात राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी यांसारख्या उत्तर भारतातील पक्ष आहे. या पक्षांच्या पदाधिका-यांवर राज्याबाहेर गेलेल्या कामगारांना मतदानासाठी आनण्यासाठी संपर्क केला जात आहे. त्यामुळे अनेक कामगारा बिहारहून परतले नाहीत. जे आहेत, त्यांना देखील गावी जाण्याची ओढ लागली आहे.
मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यात सर्वचं खासगी, सरकारी आस्थापना बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अर्थचक्र मंदावले. तब्बल दोन महिने कारखान्यांची चाके न फिरल्याने हातावर पोट असलेल्या कामगारांचे हाल झाले. हाताला काम नाही तर दुसरीकडे कुटूंबाची काळजी. लॉकडाऊन मुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्था पुर्णपणे बंद असल्याने गावाकडे जाण्यासाठी कोणी पायी, सायकल किंवा मिळेल त्या वाहनाने गाव गाठले. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर परतीचा मार्ग मोकळा झाला तरी लाखो कामगारांनी परिस्थिती पुर्वपदावर येत नाही तोपर्यंत गावाकडेचं राहणे पसंत केले. त्यात बिहार विधानसभेची निवडणुक जाहीर झाल्याने कामगारांना दिवाळी साजरी करण्याबरोबरचं निवडणुकीचे निमित्त मिळाले. नोव्हेंबर महिन्यात निवडणुक प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर वर्ष संपण्यासाठी डिसेंबर एकमेव महिना शिल्लक राहतं असल्याने नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यातचं कामावर परतण्याची मानसिकता बिहारी कामगारांमध्ये निर्माण झाल्याने त्याचा परिणाम औद्योगिक उत्पादनावर होताना दिसतं आहे.
नाशिक शहरात सातपूर, अंबड औद्योगिक वसाहती मध्ये साडे तीन हजार छोटे मोठे कारखाने आहेत. ईगतपुरी, सिन्नर, गोंदे, वाडीवहे, मालेगाव येथील औद्योगिक वसाहती मध्ये छोट्या कारखान्यांची संख्या सहा हजारांच्या आसपास आहे. साडे नऊ लाख कामगारांना कारखान्यांमधून रोजगार मिळतो. मोठ्या कंपन्यांमधील कायमस्वरुपी कामगार स्थानिक आहे तर छोट्या युनिट मध्ये कामगार कंत्राटी असून यातील साठ टक्के कामगार उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड व पश्चिम बंगाल राज्यांतील आहे. बिहार राज्यातील कामगार मुख्यत्वे छोट्या कामांमध्ये आहे. त्याचबरोबर बांधकाम व्यवसायात लेबरची कामे करतात.
...
कंपन्यांमध्ये कामगारांची अडचण
कंपन्यांमधील कायमस्वरुपी कामगार स्थानिक असल्याने सध्या अडचण नाही. परंतू लहान कंपन्यांमध्ये रोजंदारीवर काम करणारे बहुतांश कामगार बिहार, उत्तरप्रदेशातील असल्याने त्या कंपन्यांमध्ये कामगारांची अडचण भासते. बिहार निवडणुकीमुळे कामगार परतण्यात अडचणी आहेत.
- शशिकांत जाधव, अध्यक्ष, निमा.
...
https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

