महिला शेतक-यांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याचा विचार! - Electric supply in day time for women farmers | Politics Marathi News - Sarkarnama

महिला शेतक-यांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याचा विचार!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

राज्यात शेतीवर काम करणाऱ्या महिलांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात. याद्वारे शेतमालाला बाजारपेठेत स्थान निर्माण होऊन महिलांना शेतकरी उद्योजक म्हणून मानसन्मान मिळेल. महिला शेतक-यांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याबाबत शासन सकारात्मक आहे.

मालेगाव : राज्यात शेतीवर काम करणाऱ्या महिलांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात. याद्वारे शेतमालाला बाजारपेठेत स्थान निर्माण होऊन महिलांना शेतकरी उद्योजक म्हणून मानसन्मान मिळेल. महिला शेतक-यांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे कृषीमंत्री  दादा भुसे यांनी सांगितले. 

दाभाडी येथे श्रीमती भावना निळकंठ निकम यांच्या शेतावर राष्ट्रीय महिला किसान दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला किसान दिनानिमित्त शेतकरी महिलांना शुभेच्छा देतांना ते म्हणाले, सशक्त महिला सशक्त भारत ही संकल्पना देशात व राज्यात राबविण्यात येत आहे. आज महिला शेतकरी काबाडकष्ट करत असुन त्यांना पैशांची बचत करणे, आर्थिक व्यवहार करणे, भाजीपाल्याची स्वच्छता व प्रतवारी करुन बाजारात पाठविणे, मुल्यवर्धन करणे आदी कामे सर्वदूर महिला शेतकरी करत आहेत, मात्र अजुनही आपल्या देशात हवा तसा मानसन्मानासह नवीन कृषि तंत्रज्ञान महिला शेतकरी भगिनींना मिळत नाही. शेतकरी महिला दिवसभर मजुरी करतात मात्र नवनवीन आलेले कृषि तंत्रज्ञान, आधुनिकीकरणाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. त्याकरिता कृषि विभागामार्फत महिलांच्या शेतीशाळा आयोजित करण्यात येत आहे. या शेती शाळेत ज्या महिला  येतात आज त्यांना विवीध तंत्रज्ञानाची माहिती होऊन त्याचा वापर केल्याने त्यांचे शेती उत्पादनात निश्चीतच भर पडली आहे. त्याचबरोबर महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासनस्तरावरुन नवीन योजना प्रस्तावित असून मंजुरीनंतर लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

ते पुढे म्हणाले, शासनामार्फत शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर भाजीपाला रोपे मिळण्यासाठी भाजीपाला रोपवाटिकेसाठी अनुदान देण्यात येईल. त्यात प्राधान्याने महिला कृषी पदवीधरांना लाभ दिला जाईल. महिला शेतक-यांसाठी दिवसा विद्युत पुरवठा करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कृषि विभागाच्या योजनांमध्ये शेतकरी महिलांना प्राधान्य दिले जाणार असुन यात महिलांच्या क्षेत्रीय भेटी, प्रशिक्षण, अभ्यास दौरे, चर्चासत्राचे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर ग्रामीण भागात श्रीमती राहीबाई पोपरे अकोले यांचे परंपरागत बियाणे बँकेचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन सर्व महिला शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन भविष्यात जुन्या वाणांची जपणुक करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, आकाशवाणी केंद्राचे नानासाहेब पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांसह परिसरातील महिला शेतकरी उपस्थित होते.
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख