नितीन पवार म्हणाले, भूलथापांना बळी पडू नका, निवडणूक आलीय! 

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये. निवडणुका जवळ येतील तसे विरोधक भूलथापा मारतील, त्याकडे दुर्लक्ष करा असे आवाहन कळवण सुरगाणाचे आमदार नितीन पवार यांनी केले.
Nitin Pawar
Nitin Pawar

नाशिक : सुरगाणा (Surgana) तालुक्यातील आदिवासी बांधवांनी (Trible people) कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना (False words) बळी पडू नये. निवडणुका (Elections) जवळ येतील तसे विरोधक भूलथापा मारतील, त्याकडे दुर्लक्ष करा असे आवाहन कळवण सुरगाणाचे आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांनी केले. सुरगाणा येथे नूतनविद्या मंदिरात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित, राजेंद्र पवार, राऊत बाबा, मनोज शेजोळे, नितीन ब्राह्मणे, नवसू गायकवाड, महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुवर्णा गांगोडे, आनंदा झिरवाळ, तुळशीराम महाले, गोपाळ धूम आदी उपस्थित होते. 
आमदार नितीन पवार म्हणाले,‘ सुरगाणा तालुक्यात बेघर घरकुल योजने संदर्भात नागरिकांची घोर फसवणूक केली जात आहे. ज्या लाभार्थींची नावे घरकुलाच्या 'ड'यादीत निवड झाली आहे त्यांना हमखास घरकुल मिळणारच. काही अपप्रवृत्ती खोटे फार्म भरून घेत आपले उखळ पांढरे करत आहेत. कोणत्याही भूलथापांना बळी पडता कामा नये. काही जण प्रत्येक लाभार्थ्यांकडून पन्नास ते शंभर रुपये घेऊन असे फॉर्म भरून घेत आहेत. अशांना थारा देऊ नका. आगामी तीन महिन्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, म्हणूनच तुम्हांला असे बांधून ठेवले जाते आहे. 

गटविकास अधिकारी दीपक पाटील म्हणाले,‘ घरकुल योजनेसंदर्भात कोणी खासगी फॉर्म भरून घेतले, याबाबत माझ्याकडे माहिती नाही, मात्र घरकुल योजनेत सर्व पात्र लाभार्थींना लाभ दिला जाईल. नियमांचे पालन करून तसेच नियमानुसार अंमलबजावणी करण्यात येईल. तालुक्यात 'ड' घरकुल यादीत १७ हजार ९५३ घरकुल अपलोड केले आहेत. १ हजार ४६४ घरकुले नाकारले आहेत. १६ हजार घरकुलांपैकी १३ हजार घरकुले मॅपींग झाले आहेत. तीन हजार जाॅबकार्ड पूर्ण झालेले नाहीत. 

नागरिकांनी अनेक समस्यांचा पाढा वाचला. पांगारणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नाहीत, त्यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच माती रस्त्याचे बंद असलेले काम तातडीने सुरू करावे अशा मागण्या करण्यात आल्या. बैठकीत एकनाथ पवार, भावडू चौधरी, परशराम कामडी, दिनेश चौधरी, विजय देशमुख, युवराज लोखंडे, यशोधन देशमुख आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com