युवा सेनेच्या इशाऱ्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत खडसेंचा फोटो हटवला

ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार शासकीय कार्यालयात जिल्हास्तरीय वा राज्यस्तरीय राजकीय व्यक्तींचे फोटो लावण्यास प्रतिबंध आहे.
Eknath Khadse's photo was deleted in just five minutes after the warning of Yuva Sena
Eknath Khadse's photo was deleted in just five minutes after the warning of Yuva Sena

बोदवड (जि. जळगाव) : बोदवड पंचायत समितीच्या बांधकाम विभागात असलेला माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा फोटो काढण्यासंदर्भात युवा सेनेच्या वतीने आज (ता. 29 सप्टेंबर) गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाचा इशारा देताच खडसेंचा फोटो अवघ्या पाच मिनिटांत हटविण्यात आला. 

ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार शासकीय कार्यालयात जिल्हास्तरीय वा राज्यस्तरीय राजकीय व्यक्तींचे फोटो लावण्यास प्रतिबंध आहे. असे असताना बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयातील बांधकाम विभागात माजी आमदार एकनाथ खडसे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. यामुळे ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकाचे उल्लंघन होत असून हा फोटो तत्काळ काढण्यात यावा. अन्यथा येत्या दोन दिवसांत युवा सेनेकडून हा फोटो काढण्यात येईल, असे निवेदन देण्यात आले होते. 

बोदवड पंचायत समितीच्या बांधकाम विभागात मतदार संघाचे माजी आमदार एकनाथ खडसे यांचा फोटो लावलेला होता. त्यांच्या फोटोंच्या वर महापुरुषांचे फोटो असून त्यांच्या खाली डाव्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराज व उजव्या बाजूस माजी आमदार एकनाथ खडसे यांचा फोटो लावलेला आहे. बांधकाम विभागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो महापुरुषांच्या रांगेत लावण्यात यावा.

संबंधित राजकीय व्यक्तीचा फोटो तातडीने काढण्यात यावा. अन्यथा युवा सेनेच्या वतीने "संबंधित राजकीय व्यक्तीचा' फोटो शिवसेना स्टाइलने काढण्यात येईल. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो महापुरुषांच्या रांगेत सन्मानपूर्वक लावण्यात येईल, असे युवा सेनेच्या निवेदनात म्हटले होते. 

या पार्श्वभूमीवर माजी मंत्री खडसे यांचा फोटो काढण्यात आला असून येत्या दोन दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो महापुरुषांच्या रांगेत न लावल्यास शिवसेना युवा सेना सन्मानपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करत फोटो बांधकाम विभागात लावणार असल्याचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे यांनी सांगितले. 

या वेळी निवेदन देताना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी, शहरप्रमुख हर्षल बडगुजर, संजय महाजन, अल्पसंख्याक आघाडीचे उपजिल्हा संघटक कलिम शेख, तालुका समन्वयक अमोल व्यवहारे, दीपक माळी, नईम खान, योगेश राजपूत, अमोल पाटील, धनराज पाटील, अमोल जुंबळे यांच्यासमवेत शिवसैनिक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com