एकनाथ खडसे म्हणतात, ‘घरा’त प्रतिसाद नाही, म्हणूनच रस्त्यावर आलो ! 

मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंचा राजीनामा घेतल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केल्यावर खडसेंनीही या जमिनीची खरेदी पत्नी व जावयाने केली आहे, ती नियमानुसारच असल्याचा दावा केला.
एकनाथ खडसे म्हणतात, ‘घरा’त प्रतिसाद नाही, म्हणूनच रस्त्यावर आलो ! 

जळगाव : मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंचा राजीनामा घेतल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केल्यावर खडसेंनीही या जमिनीची खरेदी पत्नी व जावयाने केली आहे, ती नियमानुसारच असल्याचा दावा केला. आपल्यावरील अन्यायाबाबत चार वर्षांपासून घरातच धुणी धुतोय, पक्षातच नाराजी व्यक्त करतोय, तिकडून प्रतिसाद मिळाला नाही म्हणून मी रस्त्यावर उतरलो, असे प्रत्युत्तर खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख टाळून केला आहे. 

श्री. फडणवीस यांनी याबाबत माध्यमांत प्रतिक्रिया दिल्यानंतर खडसेंनीही त्यास प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, माझ्या राजीनाम्याबाबत तर मला भंगाळेच्या आरोपाचेच कारण देण्यात आले होते. दाऊदशी संबंधित कथित संवादामुळे पक्षाची बदनामी होत आहे, असेही त्यावेळी सांगण्यात आले होते. 
जमीन खरेदी नियमानुसार 

भोसरी जमीन खरेदी प्रकरणी राजीनामा घेतला असेल, तर हा व्यवहार पत्नी व जावयाच्या नावाने आहे, त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. एखादा व्यवहार, कार्यक्रम अमृताजींनी घेतला तर त्याच्याशी देवेंद्रजींचा संबंध जोडता येईल का? असा प्रश्‍न उपस्थित करत ही जमीन एमआयडीसीची नव्हतीच. जमिनीच्या सातबाऱ्यावर आजही मूळ मालकाचे नाव आहे, हा व्यवहारही नियमानुसार सर्व कर, मुद्रांक शुल्क भरुन झाला आहे. त्यासंबंधी सर्व पुरावे असल्याचा दावाही खडसेंनी केला. 

यासंदर्भात ‘घरातली धुणी रस्त्यावर धुत नाही’ या फडणवीसांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. यावर खडसे म्हणाले, चार वर्षांपासून माझा राजीनामा का घेतला?, नंतर उमेदवारी का नाकारली?, याचे उत्तर मी पक्षश्रेष्ठीकडे मागतोय. अनेकदा पक्षाच्या अंतर्गत बैठकीत हा मुद्दा मांडला, परंतु त्यावर उत्तर आणि न्यायही मिळाला नाही.. म्हणूनच हा विषय घेऊन रस्त्यावर आलो आहे. 

तर महाराष्ट्राची माफी मागेल 
माझ्यावर जे आरोप झाले, त्या कोणत्याही आरोपात जराही तथ्य आढळले, मी दोषी आढळलो तर आतापर्यंत केलेल्या आरोपांबाबत मी भ्रष्ट आहे, नालायक आहे, बदमाश आहे असे कबूल करत उभ्या महाराष्ट्राची हात जोडून माफी मागेल, असे आव्हान देखील श्री. खडसे यांनी यावेळी दिले. 
..

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=dXVmQy114wsAX-mrRe5&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=077d195067c04ec4d9460d4941127a5e&oe=5F8014A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com