खडसे, महाजन एकत्र येणार..गुलाबराव पाटील करणार मध्यस्थी

एकनाथ खडसे व गिरीश महाजन एकमेकांविरुद्ध आक्रमक झाले आहेत.
Eknath Khadse Girish Mahajan.jpg
Eknath Khadse Girish Mahajan.jpg

जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ खडसे  Eknath Khadse आणि भाजपचे नेते गिरीश महाजन Girish Mahajan यांचा वाद सर्वश्रुत आहे, मात्र, जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत दोघांना एकत्र आणून बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, यासाठी शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील Gulabrao Patilहे मध्यस्थी करणार आहेत. त्यांचा हा प्रयत्न सफल होणार काय ? याकडे आता लक्ष लागले आहे.

भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे व गिरीश महाजन एकमेकांविरुद्ध आक्रमक झाले आहेत. दोघे टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांचा वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाला आहे. मात्र, आता जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी सुरू आहे.

शिवसेनेला झुकते माप ; कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून दुजाभाव नाही 
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तीन पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहेत. मात्र, भारतीय जनता पक्ष सोबत येणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेत एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व आहे. गेल्या वेळी निवडणुका झाल्या त्या वेळी ते भारतीय जनता पक्षात होते. आता ते राष्ट्रवादीत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत.त्यामुळे पक्षाकडून तेच जळगाव जिल्ह्यात निर्णय घेतील.निवडूनक बिनविरोध करण्यासाठी महाजन यांचीही सहमती असणे आवश्यक आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी आता भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मुंबईत डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, तसेच शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार व जिल्हा बँक संचालक चिमणराव पाटील, भाजप आमदार व जिल्हा बँक संचालक संजय सावकारे,शिवसेना आमदार व जिल्हा बँक उपाध्यक्ष किशोर पाटील यांनीभेट घेतली.

भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांचीही भेट घेण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. गिरीश महाजन आता खडसेंसोबत एकत्र येण्यास तयार होणार काय ? हाच प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष सहकार क्षेत्रात फारसे लक्ष देत नव्हता मात्र आता केंद्रात सहकार मंत्रिपद निर्माण केले आहे.भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांच्याकडे हे मंत्रिपद आहे.त्यामुळे भाजपही आता सहकार कडे गांभीर्याने लक्ष देत असल्याचे दिसत आहे.अशा स्थितीत सहकारात दुसऱ्याच्या नेतृत्वात भाजप सहभागी होईल का हाच प्रस्न आहे.त्यामुळे खडसे आणि गिरीश महाजन याना सहकारात एकत्र आणून जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शिष्टाई सफल होईल का?या कडेच आता लक्ष असणार आहे.
Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com