शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार! - Education Minister Gaikwad Given Relief To Teacher | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

अनुदान तसेच त्या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सोडवावा, या मागणीबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षक महासंघाला दिले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या रेंगाळलेला प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.    

नाशिक : विनाअनुदानीत संस्थांबाबतच्या अध्यादेशातील `कायम` शब्द वगळल्यानंतर संस्थांचे मुल्यांकन झाले. त्यात संस्थांच्या तुकड्या अनुदानास पात्र ठरल्या. त्यांचे अनुदान तसेच त्या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सोडवावा, या मागणीबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षक महासंघाला दिले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या रेंगाळलेला प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.    

महाराष्ट्र राज्‍य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्‍या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबईत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत बैठक झाली. त्‍यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्‍न व अडचणींवर चर्चा झाली. 

यावेळी अनुदानासंदर्भात शासनाचा आदेश दिवाळीपूर्वी निर्गमित करावा असा आग्रह पदाधिकारी व आमदार तांबे यांनी धरला. शिक्षण संस्थांतील वाढीव पदांना मान्यता देण्याची मागमी जुनी आहे. त्याची फाइल मंत्रिमंडळ बैठकीत त्वरित सादर व्‍हावी. माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवावा. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०-२०-३० वर्षानंतर देण्यात येणारी आश्वासित प्रगती योजना शिक्षकांसाठी सुरू करावी. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. दिवाळीची सुट्टी जाहीर करावी. बोर्डाच्या परीक्षा व शैक्षणिक सत्र जाहीर करण्यात यावे. या व इतर मागण्यांबाबत महासंघ पदाधिकार्यांसोबत चर्चा बैठकीत झाली. 

यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे, समन्वयक मुकुंदराव आंदळकर यांनी मंत्री गायकवाड यांना दिले. वाढीव पदांच्या मान्यतेची फाइल आगामी मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येईल. दिवाळीपूर्वी महासंघ पदाधिकारी यांच्‍यासोबत शिक्षक समस्यांबाबत बैठक घेतली जाणार असल्‍याचे आश्र्वासन मंत्री गायकवाड यांनी दिल्‍याचे शिष्टमंडळाने सांगितले आहे.
...
 

https://scontent.fpnq1-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख