उपचार घेता घेता कोरोनाग्रस्तांनी जिंकली बक्षिसे!

कोरोनाचा संसर्ग झाल्यावर वैद्यकीय उपचार व देखभाल याबरोबरच रुग्णांनी सकारात्मक मानसिकता ठेउन आनंदी राहिले पाहिजे. त्याने रुग्ण हमखास बरा होण्यास मदत होते. यादृष्टीने कोरोना केंद्रातील विविध खेळ, मनोरंजनाच्या सुविधांचा प्रयोग चांगला आहे.
Shephali Bhujbal
Shephali Bhujbal

नाशिक : कोरोनाचा संसर्ग झाल्यावर वैद्यकीय उपचार व देखभाल याबरोबरच रुग्णांनी सकारात्मक मानसिकता ठेउन (Covid patient shall be positive Thinking)  आनंदी राहिले पाहिजे. त्याने रुग्ण हमखास बरा होण्यास मदत होते. यादृष्टीने कोरोना केंद्रातील विविध खेळ, मनोरंजनाच्या सुविधांचा प्रयोग चांगला आहे. कोरोनाग्रस्तांनी (Covid19 Centre caram comprtion prize Distribution) उपचार घेता घेता येथे स्पर्धाही घेतल्याने या उपक्रमाचे इतर ठिकाणीही अनुकरण होईल असा विश्वास भुजबळ नॅालेज सिटीच्या संचालिका डॅा शेफाली भुजबळ (Director Dr Shephali Bhujbal) यांनी व्यक्त केला.    

`मेट` भुजबळ नॉलेज सिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि नाशिक महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या भुजबळ कोविड केअर सेंटर मध्ये घेण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेतील विजेत्यांना आज भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना कॅरमसह इतर खेळांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णांसाठी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजेत्यांना डॉ.शेफाली भुजबळ यांच्या हस्ते आज बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी डॉ.शेफाली भुजबळ यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला. तसेच अक्षय तृतीया व रमजान ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ.शेफाली भुजबळ यांनी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना अक्षय तृतीया व रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सुरज लोखंडे, द्वितीय पारितोषिक अजय चव्हाण व तृतीय पारितोषिक प्रवीण आहिरे यांनी पटकावले. यावेळी डॉ. अभिनंदन जाधव, डॉ. नम्रता पाटील, डॉ. प्रतिक जाधव, डॉ. सविता भोसले आदी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com