आमदार डॉ राहूल आहेर कोरोनाबाधित; तीन आमदार ठरले कोरोनाचे लक्ष्य

चांदवड देवळा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार डाॅ राहूल आहेर यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ते घरीच क्वारंटाईन झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेले ते तिसरे आमदार ठरले आहेत.
आमदार डॉ राहूल आहेर कोरोनाबाधित; तीन आमदार ठरले कोरोनाचे लक्ष्य

नाशिक : चांदवड-देवळा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ राहूल आहेर यांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. गले काही दिवस ते मतदारसंघातील कार्यक्रमांत व्यस्त होते. आता ते घरीच क्वारंटाईन झाले आहे. माझ्याशी संपर्क आलेल्या नागरीकांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

डॉ आहेर हे कोरोनाचा संसर्ग झालेले तिसरे आमदार आहेत. यापुर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर हे देखील कोरोनाचा संशय आल्याने स्वतःहून घरीच क्वारंटाईन झाले होते. डॉ आहेर मतदारसंघातील विविध कार्यक्रमात व्यस्त होते. कोरोनाचे लॅाकडाउन जाहिर झाल्यावर त्यांनी काही काळ कार्यालयातून काम केले होते. त्यानंतर मात्र त्यांनी पुरेशी दक्षता घेत मतदारसंघातील दौरे सुरु केले होते. या कालावधीत त्यांनी विविध बैठकाही घेतल्या होत्या. बियाणे व युरीयाच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकताच कृषीमंत्री दादा भुसे यांच्या सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली होती. दोन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत वाटत असल्याने त्यांनी स्वतःच आपल्या स्वॅबची चाचणी करुन घेतली. त्यात काल त्यांचा अहवाल कोरोनाबाधीत आला. त्यानंतर त्यांच्या कुटंबियांचीही चाचणी झाली. सुदैवाने त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेऊन त्यांनी घरीच क्वारंटाईव होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याशी संपर्कात आलेल्या नागरिक, कार्यकर्ते व हितचिंतकांनी दक्षता घ्यावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. क्वारंटाईन कालावधी संपुष्टातच येताच आपण पुन्हा पुर्ववत कामकाजाला सुरवात करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. 

यापुर्वी जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या सरोज अहिरे यांचा अहवाल कोरोना पॅाझिटिव्ह आला होता. आमदार अहिरे यांना डिस्चार्ज घेतला आहे. आणदार दराडे सध्या क्वारंटाईन आहेत. त्यांच्या पाठोपाठ आमदार आहरे हे तिसरे आमदार ठरले आहेत. 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=m6EI_UoaddIAX8yINNZ&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=6c3cf95fbc128a3aab1be06c24554872&oe=5F3CD827

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com