डॉ  हर्षल तांबे म्हणतात, `या`साठी घ्यावी सगळ्यांनी कोरोना लस घ्या ! - Dr Harshal Tambe says everyone should take Anti Covid Does | Politics Marathi News - Sarkarnama

डॉ  हर्षल तांबे म्हणतात, `या`साठी घ्यावी सगळ्यांनी कोरोना लस घ्या !

संपत देवगिरे
शनिवार, 30 जानेवारी 2021

कोरोना काळातही रुग्णांना सेवा देणारे धामणगाव (इगतपूरी) येथील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाने आता लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात नुकतीच एक मोहिम सुरु करण्यात आली.

नाशिक :  कोरोना काळातही रुग्णांना सेवा देणारे धामणगाव (इगतपूरी) येथील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाने आता लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात नुकतीच एक मोहिम सुरु करण्यात आली. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालकांनी स्वतः त्यासाठा पुढाकार घेतला. ते म्हणाले, `मी ही लस घेणार आहे.    मात्र कोरोना विरोधात लढा देणा-या प्रत्येकाने ही लस घ्यावी. कारण हा लढा अद्याप संपलेला नाही.`

एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाने कोरोना सारख्या जागतिक आपत्तीशी लढा देण्यासाठी आता एसएमबीटी हॉस्पिटल देखील सज्ज झाले आहे, आजच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राचे उदघाटन झाले. इगतपूरी तालुक्यासह नाशिकच्या विविध भागात या संस्थेने विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या आहेत. विशेषतः परिसरातील आदिवासी व शेतकरी यांना अतिशय मोफक दरात तसेच विविध उपचार मोफत केले जात असल्याने त्याचा लाभ या भागाला झाला आहे. त्यांनी ही सेवा कोरोना कालावधीतही सुरु ठेवली होती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. 

या लसीकरणाला सुरवात करतांना प्रारंभी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ मीनल मोहगावकर व डॉ अरुण टेकाळे यांनी लस घेतली. उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले, लसीबद्दल असलेले शंका, भ्रम दूर करण्याचे काम डॉ मीनल मोहगावकर यांनी केले. लस पूर्णपणे सुरक्षित असून या महामारीपासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे डॉ अरुण टेकाळे यांनी नमूद केले . 

कोरोनाच्या काळात देखील सामाजिक जबाबदारी घेत एसएमबीटी हॉस्पिटलने कोविड सेंटर सुरु करून हजारो अतिगंभीर कोरोना रुग्णांना जीवनदान देण्याचे काम केले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र एसएमबीटी हॉस्पटलचे आरोग्य कर्मचारी काम करत होते. सामाजिक दायित्व जपत समाज निरोगी आणि सुदृढ राहावा यासाठी हॉस्पिटलच्या वतीने नियमित दर महिन्याला विविध आजारावर शिबिरे आयोजित केली. त्याचा हजारो रुग्णाच्या आयुष्यात आनंद फुलवायचे काम ही संस्था करीत आहे
सुरवातीला या लसीकरण केंद्रामार्फत हॉस्पिटल तसेच इगतपुरी तालुक्यातील आरोग्य सेवकांना कोरोना लस दिली जाणार आहे.आज सायंकाळपर्यंत 56 आरोग्य सेवकांना लस  देण्यात आली. कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नसून टप्प्या टप्प्याने उर्वरित आरोग्य सेवकांना देण्यात येणार आहे  

यावेळी संस्थेचे मुख्याधिकारी श्रीराम कुऱ्हे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र चौधरी, डॉ संतोष पवार, मयूर रावळ, अनिमेश दुबे आदी उपस्थित होते. 

कोरोना या जागतिक आपत्तीत आपल्या शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनत घेत या लसीची निर्मिती केली आहे. लस  पूर्णपणे सुरक्षित आहे. कुठलीही भीती न बाळगता शासन नियमाप्रमाणे लसीकरण करून घ्यावे. 
- डॉ हर्षल तांबे. व्यवस्थापकीय विश्वस्त, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख