डॉ. भारती पवारांच्या मतदारसंघात ७३ कोटींचे रस्ते मंजूर - Dr Bharti Pawar sanctions 73 cr fund for roads, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

डॉ. भारती पवारांच्या मतदारसंघात ७३ कोटींचे रस्ते मंजूर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 जुलै 2021

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील १६ रस्त्यांच्या कामांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत ७३ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून नांदगाव, पेठ, दिंडोरी, येवला, चांदवड, मालेगाव, निफाड, कळवण तालुक्यांतील ११६.५३ किलोमीटरची कामे होतील.

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील १६ रस्त्यांच्या कामांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत ७३ कोटी १९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. (73 cr fund sanctions for 16 roads in Dindori Constituency)  त्यातून नांदगाव, पेठ, दिंडोरी, येवला, चांदवड, मालेगाव, निफाड, कळवण तालुक्यांतील ११६.५३ किलोमीटरची (Roads total length will 116.53 KM) कामे होतील. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी ही माहिती दिली.

रस्त्यांच्या कामांमुळे शेतमाल वाहतुकीसाठी मदत होणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. तालुकानिहाय रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर झालेला निधी रुपयांमध्ये असा, नांदगाव- राष्ट्रीय महामार्ग ते हिसवळ हार्डे वस्ती : सात कोटी ६० लाख, पेठ- तिळभाट ते गांगोडबारी- शिंदे : तीन कोटी ६९ लाख, दिंडोरी- गोंदेगाव ते खेडगाव- बहादुरी रस्ता : पाच कोटी ५८ लाख, उमराळे- हातनोरे : नऊ कोटी ४७ लाख, येवला- जळगाव नेऊर ते पाटोदा : तीन कोटी ४८ लाख, कानडी ते ठाणगाव- गुजरखेडे : तीन कोटी चार लाख,

पिंपरी ते सावरगाव- तांदूळवाडी : तीन कोटी २३ लाख, चांदवड- चांदवड ते तळवाडे : तीन कोटी ४० लाख, मालेगाव- राष्ट्रीय महामार्ग ते कौळाणे- चंदनपुरी : पाच कोटी २३ लाख, निफाड- दात्याने ते शिरगाव : चार कोटी १४ लाख, नैताळे- कोळेवाडी- सोनेवाडी- निफाड : दोन कोटी ५७ लाख, भुसे ते म्हाळसाकोरे : दोन कोटी १४ लाख, नांदूरमधमेश्‍वर ते धारणगाव- खडक : तीन कोटी ३५ लाख, कळवण- साकोरे ते जिरवाडे- नवी बेज : आठ कोटी ६१ लाख, खेडगाव ते रवळजी जयदर : तीन कोटी ३५ लाख, गोसराणे ते गंगापूर : तीन कोटी ७५ लाख.
...
हेही वाचा...

बच्चू कडू यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख