शेतकऱ्यांना धनादेश नको, रोखीनेच पैसे द्या !  - Dont issue cheques, give cash for agreeculture produces | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांना धनादेश नको, रोखीनेच पैसे द्या ! 

विजय काळे
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

केंद्र शासनाच्या यंत्रणांनी सुचना दिल्याचे बोलले जाते. त्याचा परिणाम म्हणून व्यापारी शेतमालाची रक्कम धनादेशाद्वारे देत आहे. त्यामुळे शतकरी नाराज आहेत. यावरुन वाद सुरु झाल्याने त्यात खासदार डॅा भारती पवार यांनी ङस्तक्षेप करीत रोखीनेच पैसे द्यावेत असा आग्रह धरला आहे. 

रेडगाव : गेल्या महिन्यात लासलगावच्या कांदा व्यापाऱ्यांची आयाकर विभागाने तपासणी केली होती. यासंदर्भात केंद्र शासनाच्या यंत्रणांनी सुचना दिल्याचे बोलले जाते. त्याचा परिणाम म्हणून व्यापारी शेतमालाची रक्कम धनादेशाद्वारे देत आहे. त्यामुळे शतकरी नाराज आहेत. यावरुन वाद सुरु झाल्याने त्यात खासदार डॅा भारती पवार यांनी ङस्तक्षेप करीत रोखीनेच पैसे द्यावेत असा आग्रह धरला आहे. 

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यासह भुसार शेतमाल विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना रोख पैसे न देता व्यापाऱ्यांकडून धनादेश दिले जात आहेत. त्यामुळे  शेतकऱ्यांना गरजेच्या वस्तू खरेदी न करताच हात हलवीत परत जावे लागते. अन्य बाजार समित्यांत रोख पैसे मिळतात. मग लासलगावला का मिळत नाहीत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

गेल्या महिन्यात कांद्याचे भाव वाढले होते. त्यामुळे लासलगावच्या ११ व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने चौकशीच्या नावाखाली छापे घातले. हा चौकशीचा ससेमिरा मागे लावत, शेतकऱ्यांनाही त्रासदायक ठरतील असे अनेक प्रश्न आयकर विभागाने विचारले. त्याचा त्रास आता थेट शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. चौकशीमध्ये शेतकऱ्यांना रोखीने पैसे देऊ नये, खरेदी केलेला माल शेतकऱ्यांचाच होता का ? ते शेतकरी असल्याचा पुरावा काय? शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे देऊ नये, अशा सूचना दिल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांनाही आयकर विभागाला भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची वेळ आली. 

वास्तविक जिल्ह्यातील सर्व बाजार समिती कार्यक्षेत्रात शेतमाल विक्रीला येतो. त्यामुळे येथे सर्व शेतकरीच शेतमाल विक्रीला आणतात. या चौकशीचा फार्समुळे नवी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत बाजार समितीने देखील तसा आदेश काढला. त्यामुळे खासदार भारती पवार यांनी त्यात हस्तक्षेप करुन शेतीमालाचे पैसे रोखीनेच द्यावेत, अशी मागणी केली आहे. लवकरच याबाबत आयकर विभागाशी चर्चा करु असे त्यांनी सांगितले.
...
"आयकर विभागाच्या धाडीनंतर व्यापाऱ्यांनी बाजार समितीला पत्र देऊन, धनादेशाद्वारेच पैशांचे वाटप केले जाईल, या अटीवरच ते लिलावात सहभागी झाले."
- नरेंद्र वाढवणे- सचिव, लासलगाव बाजार समिती. 
...
आम्ही आधी शेतकरी हितालाच प्राधान्य देतो. परंतु आयकर विभागाने रोखीने पैसे वाटपावर प्रश्न चिन्ह निर्माण केले. त्यामुळे तसा निर्णय घ्यावा लागला. व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दलही कुणीतरी बाजू मांडली पाहिजे.

- नंदकुमार डागा, व्यापारी.
...
पैशांची गरज असते, तेव्हाच शेतकरी बाजारात शेतमाल विक्रीला आणतो. त्यामुळे त्याला रोखीनेच पैसे मिळावेत. परंतु आयकर विभागाने काही वेगळी भूमिका घेतली असेल, तर त्याची देखील माहिती घेतली जाईल.

- खसादार भारती पवार, 
....

 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख