वीजेच्या वसुलीसाठी गाव अंधारात बुडवू नका ! - dont cut power of Villages Deemands Bharti Pawar. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

वीजेच्या वसुलीसाठी गाव अंधारात बुडवू नका !

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

दोन चार शेतक-यांनी वीजेचे बील भरले नाही म्हणून संबंध गावाचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे काम राज्य शासन करीत आहे. सबंध गाव अंधारात ढकलण्याचे हे प्रकार तातडीने थांबवावेत.

नाशिक  : कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात आहे. शेतकरी अडचणीत आहे. असे असतांना दोन चार शेतक-यांनी वीजेचे बील भरले नाही म्हणून संबंध गावाचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे काम राज्य शासन करीत आहे. सबंध गाव अंधारात ढकलण्याचे हे प्रकार तातडीने थांबवावेत, अशी मागणी खासदार डॅा भारती पवार यांनी लोकसभेत केली. 

तातडीच्या प्रश्नावर त्यांनी महाराष्ट्रात वीज बीलांच्या वसुलीसाठी डिपीचा वीज पुरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. याकडे लोकसभेच्या सभापती  रेखा नेगी यांचे लक्ष वेधले. यावेळी खासदार पवार म्हणाल्या, कोणत्याही परिस्थीतीत जनतेचा वीज पुवरठा खंडीत करु नये. हे प्रकार तातडीने थांबवले पाहिजे. 

त्या म्हणाल्या, कोरोनाचे असेल किंवा निसर्गाचे संकट असेल शेतकरी मोठ्या धैर्याने या संकटाचा मुकाबला करीत आहे. आज देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भर घालण्याचे काम शेतकरी करतात. शेतकरी या संकटांचा मुकाबला करीत असतांना त्यांना धीर देने गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या गहू, द्राक्ष, कांदा, हरभरा आदी रब्बी पिकांची काढणी सुरु आहे. त्यासाठी वेळेवर शेतीला पाणी देणे गरजेचे असताना महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढला आहे की, जर वीजेचे बील भरले नाही तर पुरवठा खंडीत करावा. आज शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने विजेची गरज आहे. त्यांना नोटीस दिली पाहिजे. बील भरण्यासाठी सवलत दिली पाहिजे. परंतु चार शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही तर शंभर शेतकऱ्यांनी वीजेचे बील भरलेले आहे ते न पाहता तात्काळ गावातीलच डीपीचा पुरवठा खंडीत करणे योग्य नाही. अनेक गावांत असे कनेक्शन बंद करण्यात येत आहेत. त्याचा मी निषेध करते. केंद्र सरकारच्या माध्यमातून या गंभीर मुद्द्यावर राज्य सरकारने तात्काळ लक्ष घालून सर्वसामान्य जनतेचा वीज पुरवठा खंडित करु नये. वीजेचा पुरवठा तात्काळ सुरळीत करावा अशी मागणी त्यांनी केली. 
...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख