Chhagan Bhujbal, NCP
Chhagan Bhujbal, NCP

माझ्या दारासमोर बस हवी, ही भूमिका नको 

जगात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठेही फायद्यात नाही. नाशिककरांना सक्षम व फायदेशीर सेवा द्यायची असेल, तर नगरसेवकांनी माझ्या दारासमोर बस आलीचं पाहिजे, ही भूमिका स्वीकारता कामा नये. आधुनिक सुविधांचा स्वीकार करताना नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवावे, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

नाशिक : जगात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठेही फायद्यात नाही. (Public transport is in loss all over world) नाशिककरांना सक्षम व फायदेशीर सेवा द्यायची असेल, तर नगरसेवकांनी माझ्या दारासमोर बस आलीचं पाहिजे, (Nashik people should not keep expectation of Bus at Doorstep) ही भूमिका स्वीकारता कामा नये. आधुनिक सुविधांचा स्वीकार करताना नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवावे, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला. 

शहराची `सिटी लींक कनेक्टींग नाशिक` या बससेवेचे उद्घाटन आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी  पालकमंत्री छगन भुजबळ होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की जगात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फायद्यात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या बससेवेलादेखील ३५ कोटी रुपयांचा वार्षिक तोटा येणार असल्याचा अंदाज आहे. तो तोटा सहन करण्याची शक्ती महापालिकेने ठेवावी. बससेवा चालविताना फायद्यापेक्षा सुविधेचा विचार व्हायला पाहिजे. सेवा दिली, तरच सेवेवरचा विश्‍वास वाढेल. सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास यश नक्कीच मिळेल. 

ते पुढे म्हणाले, की स्वस्त वाहतूक व प्रदूषण मुक्ततेचा हेतू साध्य झाला पाहिजे. नाशिकचा विकास हाच एकमेव अजेंडा सर्वांचा असावा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, समृद्धी महामार्ग, सुरत-चेन्नई ग्रीन फ्लिड महामार्ग नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमुळे पायाभूत सुविधा वाढणार आहेत. त्यामुळे आधुनिक सुविधांचा स्वीकार करताना नाशिककरांनीदेखील जबाबदारीचे भान ठेवावे. नाशिकचा विकास होत असताना धूर ओकणारे कारखाने नको. त्यापेक्षा एज्युकेशन, मेडिकल, वायनरी क्षेत्रांचे हब आणि शेतीवर आधारित उद्योग हवेत. 

या कार्यक्रमास महापौर सतीष कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागूल, माजी मंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश गिते, महापालिकचे आयुक्त कैलास जाधव, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहूल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, दिक्षा लोंढे उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com