जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा, कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करु नका

नाशिक जिल्ह्यात एक हजार 639 कोटींचे कर्जवाटप झाले आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 156 कोटी अधिक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा, कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करु नका

नाशिक : प्रारंभी जिल्हा बॅंकेच्या अडचणी आणि परतफेडीच्या अडचणींमुळे पीककर्ज वाटपात मागे पडलेल्या नाशिक जिल्ह्यात एक हजार 639 कोटींचे कर्जवाटप झाले आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 156 कोटी अधिक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, व्यापारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. मांढरे म्हणाले, 12 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीपेक्षा आज झालेल्या बैठकीत 200 कोटी रुपयांच्या पीककर्जाचे अधिक वाटप करण्यात आले आहे. तीन हजार 303 कोटी कर्जाच्या उद्दिष्टापैकी दोन हजार 400 कोटी कर्जाचे वाटप दहा  बँकांकडे आहे. त्यानुसार 12 ऑगस्टला झालेल्या बैठकीत बँक ऑफ महाराष्ट्राने 271 कोटीचे कर्जवाटप केले होते. आजपर्यंत ते 318 कोटी पर्यंत करण्यात आले आहे. याचप्रमाणे जिल्हा बॅंकेने 270 कोटी, बँक ऑफ बडोदा 263 कोटी, बँक ऑफ इंडिया 66 कोटी, युनियन बँक ऑफ इंडिया 112 कोटी, स्टेट बँक ऑफ इंडिया 265 कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 74 कोटी तसेच एचडीएफसी बॅंकेने 3 कोटी व कोटक महिंद्रा 6 कोटी कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. 

मागील वर्षीच्या तुलनेत पीककर्ज वाटपात 156 कोटी रुपयांची वाढ झाली. गेल्या दहा ते बारा दिवसात शेतकऱ्यांना साधारण अडीशे ते तीनशे कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण झाले आहे. इगतपुरी व जिल्ह्याचा पश्चिम भागात भात, द्राक्ष आदी पिकांची मागणी उशिराने होत असल्याने उर्वरित पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट महिनाअखेर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी बँकांना दिल्या आहेत. 

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत 176 कोटी
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या मध्यावधीत  एक  हजार 267 कोटी प्राप्त उद्दिष्टापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांना 176 कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत कर्ज वाटप करताना शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही यासाठी एनडीसीसी बँकेने विशेष दक्षता घ्यावी, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उशिराने रक्कम मिळाली असूनही जिल्ह्यात 34 टक्के इतके कर्ज वाटप करण्यात आले आहे. 
...
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=n7lpCgTo7rwAX_PWvN_&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=9312f933ba69467e8b0d61787331e461&oe=5F6C4E27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com