जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू करा

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता रुग्णसंख्येची साखळी तोडण्याकरिता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी २३ मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश पारीत केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. या बाजार समित्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी आमदार दिलीप बनकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे केली आहे.
Bankar- Pawar
Bankar- Pawar

पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता रुग्णसंख्येची साखळी तोडण्याकरिता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी २३ मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश पारीत केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. या बाजार समित्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी आमदार दिलीप बनकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे केली आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रित पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची राहील. याबाबत समन्वयाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांची राहील. त्या परिपत्रकानुसार बाजार समित्या सुरू करण्यास सुचविले आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शेतीमालाचे लिलाव उघड होत असल्याने शेतकरी विकेंद्रित पद्धतीने आपला शेतमाल विक्री करण्यास नाखूश आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे शेतमालास विकेंद्रीकरणामुळे चढ्या भावाने मालाची विक्री होत नाही.

पर्यायाने योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आजचा बाजारभाव काय आहे, याची माहिती नसल्यामुळे आर्थिक लूट होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. शेतकरी आपला माल हा इंधन खर्च करून किंवा भाडोत्री वाहनाने आणत असल्याने व तोच शेतमाल कमी भावात खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची एकप्रकारे आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे शेतकरी व विविध संघटनांनी बाजार समित्या सुरू करून शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बाजार समित्यांमध्ये करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार बनकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निसर्गाशी दोन हात करीत पिकविलेला भाजीपाला, कांदा, टोमॅटो व डाळिंब योग्य दराने विक्री होण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, पणनमंत्री बाळासाहेब पाटील, कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com