निवडणुकीच्या मागणीतून देविदास पिंगळेंचा शिवाजी चुंभळेंना शॅाक

कोरोना संसर्गामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीस दिलेली मुदतवाढ संपुष्टात आली आहे. यामुळे लवकरात लवकर निवडणूक प्रक्रिया घ्यावी, अशी मागणी सभापतींसह संचालक मंडळाने सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.
Pingle APMC
Pingle APMC

नाशिक : कोरोना संसर्गामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik APMC Election) निवडणुकीस दिलेली मुदतवाढ (Election extention limit over) संपुष्टात आली आहे. यामुळे लवकरात लवकर निवडणूक प्रक्रिया घ्यावी, (Take election as soon as possible) अशी मागणी सभापतींसह संचालक मंडळाने सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्याकडे केली आहे. 

विद्यमान संचालक मंडळानेच निवडणुकीची मागणी केल्याने सध्या विखुरलेल्या विरोधकांना हा राजकीय शॅाक आहे. सध्या माजी सभापती शिवाजी चुंभळे सातत्याने बाजार समितीच्या निर्णयांना विरोध करीत असतात. मात्र त्यांच्या सोबतीला अन्य कोणीही नसल्याने त्यांची प्रत्येक आघाडी एकाकी असते. अशा स्थितीत सध्या तरी बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष, माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या विरोधात अन्य कोणीही नाही. हे सर्व विरोधक गाफील असल्याने निवडणूक घ्या ही मागणी करून त्यांनी श्री. चुंभळेंना शॅाक दिला आहे. 

यासंदर्भात शिष्टमंडळाने मंगळवारी सकाळी मंत्री महोदयांची भेट घेतली. नाशिक बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ गेल्या वर्षी १९ ऑगस्ट २०२० रोजी संपुष्टात आला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकार व पणन विभागाकडून संचालक मंडळास पुढील सहा महिन्यांसाठी म्हणजेच १९ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तसा प्रस्तावदेखील जिल्हा उपनिबंधकांनी शासनास सादर केला होता. मात्र, कोरोना प्रादुर्भाव वाढतच होता.

त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये आणि कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी शासनाने पुन्हा ५ जानेवारी २०२१ रोजी आदेश काढला आणि २० फेब्रुवारी २०२१ पासून पुढील सहा महिन्यांकरिता मुदतवाढ दिली. दुसऱ्यांदा दिलेली ही मुदतवाढही १९ ऑगस्ट २०२१ रोजीच संपुष्टात आली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे, आमदार हिरामण खोसकर व संचालक तुकाराम पेखळे, दिलीप थेटे, विश्वास नागरे आदींच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. १४) सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. या वेळी बाजार समितीची निवडणूक घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. श्री. पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर निवडणूक घेण्याचे आश्वासन दिले. 

दोन वेळा मुदतवाढ 
बाजार समिती निवडणुका २० ऑगस्ट २०१५ झाल्या होत्या. १९ ऑगस्ट २०२० संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली होती. सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग २४ सप्टेंबर २०२० रोजीच्या पत्रानुसार २० ऑगस्ट २०२० ते १९ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदत वाढ. त्यानंतर पुन्हा सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग पुन्हा ५ जानेवारी २०२१ च्या पत्रानुसार २० फेब्रुवारी २०२१ ते १९ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com